बीड (रिपोर्टर): भरधाव वेगात निघालेला ट्रक मंझेरी फाट्यावर पलटी झाला. या ट्रकमध्ये राशनचा तांदूळ होता. गाडी पलटी झाल्याने तांदळाचे पोते अस्ताव्यस्त रस्त्यावर पडले होते. सदरील हा तांदूळ नेमका कुठे चालला होता? याबाबत माहिती उपलब्ध झाली नव्हती.

धाराशीवहून बीडकडे निघालेला ट्रक (क्र. आर.जे. 49 जी.ए. 7997) मंझेरी फाटयाजवळ पलटी झाला. ट्रक पलटी झाल्यानंतर आतील तांदळाचे पोते अस्तव्यस्तपणे रस्त्यावर पडले. सदरील हा माल राशनचा असावा, असा संशय व्यक्त केला जात होता. गोण्यांचे चुंगडे बांधण्यात आले होते. हा माल काळ्या बाजारात तर जात नव्हता? अशीही शंका घेतली जात होती. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.










