धारूर (रिपोर्टर): उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख असल्यामुळे इच्छुकांची मोठी गर्दी उसळली होती. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून बालासाहेब जाधव, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गायकवाड, शिंदेसेनेकडून गवळी तर भाजपाच्या वतीने निर्मळ यांनी अर्ज दाखल केलेले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख असल्यामुळे अर्ज भरण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी उसळली होती. प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आपआपल्या उमेदवारांचे नाव जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बालासाहेब जाधव यांनी आपला अर्ज दाखल केला. शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून अर्जून गायकवाड, शिंदेसेनेकडून सुरेश गवळी आणि भाजपाकडून रामचंद्र निर्मळ यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनेक इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. अर्ज दाखल करण्याची दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ आहे










