• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

माजलगाव नगर परिषद निवडणुकीत गाजतोय कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा.3 मुख्याधिकार्‍यासह नागराध्यक्ष गजाआड असलेली महाराष्ट्रातील नगर परिषद

by गणेश सावंत
November 22, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


आरोप प्रत्यारोपाचे होतेय वैचारिक समुद्र मंथन.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले एकाच घरातून 3 उमेदवार

माजलगाव (दिनकर शिंदे ) आगामी माजलगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोट्यवधींच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा मध्यवर्ती ठरला आहे. निवडणूक प्रचाराचा बाजा वाजू लागल्यापासूनच निवडणूक प्रचारापेक्षा आरोप-प्रत्यारोप अधिक जाणवत आहे. नगर परिषदेतील गेल्या काही वर्षांत झालेले कथित गैरव्यवहार, कारभार आणि प्रशासनातील अनियमितता या सगळ्यांवरून शहरात राजकीय तापमान चढत आहे. माजलगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी तापत असताना कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचंड गाजू लागला आहे.

विकासकामांच्या नावाखाली झालेल्या प्रचंड गैरव्यवहाराचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत असून, यामुळे संपूर्ण निवडणूकच चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. शहरातील मतदारांमध्येही यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
तीन मुख्याधिकार्‍यांसह नागराध्यक्ष गजाआड असल्याची धक्कादायक परिस्थिती आणि त्यामागील कारणांची राजकीय नेमणूक, प्रशासकीय हस्तक्षेप आणि दबावाची मालिका यावर आता राज्यभरात चर्चा रंगू लागली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या त्सुनामीमुळे वैचारिक समुद्रमंथनाला उधाण आले आहे. याच दरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या चाऊस यांच्या एकाच घरातून तब्बल तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. या सर्व बाबींमुळे माजलगावचा निवडणूक माहोल राज्याच्या राजकारणाला दिशा देणारा ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

————————————————-
3 मुख्यधिकारी व नगराध्यक्ष गजाआड गेलेली महाराष्ट्रातील एकमेव नगर परिषद
माजलगाव नगर परिषदेमध्ये गेल्या काही काळात तब्बल तीन मुख्याधिकार्‍यांवर कारवाई झाली असून माजी नगराध्यक्षही कारवाईच्या फेर्‍यात अडकले होते, अशी माहिती विरोधकांकडून प्रसारित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेवर ‘भ्रष्टाचाराचे केंद्र’ अशी टीका अधिक तीव्र झाली आहे. प्रकल्पांच्या निविदा, निधी वितरण, मालमत्ता कर व पाणीपुरवठा कामकाज यांसंदर्भात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. तथापि, विद्यमान प्रशासन व सत्ताधारी गट हे सर्व आरोप फेटाळून लावत असून हे आरोप निवडणुकीच्या तोंडावर केलेले राजकीय डाव असल्याचे सांगत आहेत.
————————————————-
एकाच घरातून तीन उमेदवार; चर्चांना उधाण
या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या चाऊस यांच्या घरातूनच तीन उमेदवार मैदानात उतरले आहेत. विरोधक या मुद्द्यावर जोरदार टीकास्त्र वापरत असताना समर्थक या उमेदवारांच्या सामाजिक कार्याचा दाखला देत बचाव करत आहेत. एकाच घरातील तिघेही नगरपरिषदेच्या वेगवेगळ्या प्रभागांतून उभे राहिल्याने शहरात नव्या चर्चा रंगत आहेत.
————————————————-
निवडणुकीत वैचारिक ‘समुद्र मंथन’ : कोट्यवधींच्या भ्रष्टाचारावरून सध्या शहरात जणू वैचारिक समुद्र मंथन  सुरू आहे. सोशल मीडियापासून गल्लीबोळातील चर्चांपर्यंत भ्रष्टाचाराविरोधात जनतेचा आवाज वाढताना दिसतोय. स्वच्छ प्रशासन, विकासाचा वेग, पारदर्शक कामकाज-या मुद्द्यांवर सर्वच पक्षाच्या उमेदवाराकडून घोषणा केल्या जात आहेत, पण जनतेला भाषणांपेक्षा ठोस आश्वासने आणि अंमलबजावणीची हमी हवी आहे.
————————————————-
मतदारांचा कौल निर्णायक : माजलगावमधील ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता भ्रष्टाचार विरुद्ध पारदर्शकतेची लढाई ठरत आहे, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. आरोपांच्या गदारोळात, पारदर्शकतेची मागणी करत असलेल्या मतदारांचा कौल कोणाला मिळतो, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

Previous Post

केजमध्ये अल्पवयीन मुलीवर कॉफी शॉप नेऊन लैंगिक अत्याचार  

Next Post

पाचशेच्या नोटेत, मटणाच्या बोटीत अन् एका चपटीत निवडणुका पाहू नका -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ कडाडले

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post

पाचशेच्या नोटेत, मटणाच्या बोटीत अन् एका चपटीत निवडणुका पाहू नका -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ कडाडले

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?