अंबाजोगाई (रिपोर्टर): शहरातल्या रविवार पेठ भागात एका गोडाऊनमध्ये गुटखा असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना झाल्यानंतर रात्री त्यांनी याठिकाणी छापा मारला असता एक स्विफ्ट डिझायर व तिच्यामध्ये सुमारे दीड लाख रुपयांचा गुटखा मिळून आला. कारसह गुटखा अंबाजोगाई शहर पोलिसांनी ताब्यात घेतला असून एक जणाला अटक करण्यात आली तर दुसरा घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक असे की, अंबाजोगाई शहरातील वहीद मणियार हा अवैधरित्या गुटख्याची तस्करी कत असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार पोलिस वहीद याच्या मागावर होते. गुप्त माहितीनुसार रविवारपेठ भागात इरफान बागवान याच्या गोडाऊनमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना झाली. त्यांनी रात्री याठिकाणी छापा माला असता त्याठिकघाणी एम.एच. 14 बी.आर. 1606 क्रमांकाची स्फ्टि डिझायर व गुटखा मिळून आला. पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांचा माल जप्त केला व वहीद मणियार याला ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेऊन इरफान बागवान हा पसार झाल्याचे सांगण्यात येते.











