Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeबीड‘त्या’ वन मजुराची आत्महत्या?

‘त्या’ वन मजुराची आत्महत्या?


बीड (रिपोर्टर)- करचुंडी येथील एक वनमजूर गेल्या पंधरा दिवसांपासून कामाला गेल्यापासून बेपत्ता होता. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. काल दुपारी सौताडा येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत त्या मजुराची बॉडी आढळून आली होती. सदरील मजुराची आत्महत्या की त्याचा घातपात झाला हे मात्र अद्याप समजू शकले नाही. पाटोदा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
बाबूराव काशीनाथ मुळीक (वय ५६ रा. करचुंडी) हे वनविभागात मजूर म्हणून कार्यरत होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ते कामाला चाललो म्हणून घरी सांगून गेले होते मात्र ते परत आले नसल्याने वनविभाग आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते आढळून न आल्याने नेकनूर पोलिस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. काल सौताडा येथे एका झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रेत ताब्यात घेत शवविच्छेद-नासाठी पाटोदा रुग्णालयात रवाना केला. ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलिस करत आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!