बीड (रिपोर्टर) बीड शहरातील धांडे गल्ली भागात राहणारे हरीभाऊ अण्णा दशरथ पौळ यांचे दु:खद निधन झाले. हरीभाऊ पवळ हे मनमिळावू स्वभावाचे म्हणून सर्वत्र परिचीत होते. ते एक चांगले राजकीय विश्लेषक होते. शेतीमध्ये त्यांना प्रचंड आवड होती. त्यांचा मेडिकलचा व्यवसायही होता. ते सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे हितचिंतक होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी साडेपाच वाजता भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या बाजुस मुक्तीधाम स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. पवळ कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.










