मुंबई (रिपोर्टर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विधान परिषद उमेदवारी आणि आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सातत्याने पुढे येत आहे. अशातच काल (गुरुवारी) त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या गणरायाचे दर्शन घेतले.
मागच्या अडीच वर्षांत राज्यसभा, विधान परिषद आणि परवाच्या मंत्रीमंडळ विस्तारात नावाची चर्चा असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. आता पुन्हा मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा आहे. आता तरी पंकजा मुंडे यांना संधी मिळेल का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे दोघांमधील कटुता कमी होईल का? (पान 7 वर)
असे सवाल कार्यकर्यांमध्ये उपस्थित होत आहे. मुंडे यांनी काल फडणवीसांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी फडणवीस नसले तरी पंकजा मुंडे व अमृता फडणवीस यांच्यात संवाद झाला. आता मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे हे निश्चित आहे. आताच्या मंत्रीमंडळात एकही महिला नाही. भविष्यातील विस्तारात महिलेचा सहभाग होईल हे निश्चित आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना प्रसादरुपी सत्तेत संधी मिळेल का ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.