कोट्यवधी रुपये खर्च करुन फायदा काय झाला?
बीड (रिपोर्टर)ः- गावातच सज्जा असावा या चांगल्या दृष्टीकोनातून गावोगावी तलाठ्यासाठी इमारत बांधण्यात आली. मात्र या इमारतीचा उपयोग तलाठी करत नाही. तलाठी सज्जे हे फक्त शेाभेचे कार्यालय बनले.
काही कार्यालयाच्या ठिकाणी तर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले तर काही ठिकाणी पत्ते खेळण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होत असल्याने सदरील इमारतीचा वापर करण्याचा सक्तीच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दयायला हव्यात.]
राज्य सरकाने गेल्या काही वर्षापूर्वी राज्यभरातील तलाठी सज्जासाठी नव्या इमारती बांधल्या यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करण्यात आल्या. तलाठी सज्जे बांधूनही त्याचा वापर सुरू करण्यात आला नाही. तलाठी महाशय हे आपल्या सोयी नूसार शहराच्या ठिकाणी कार्यालय थातट असल्याचे दिसून येत आहे. अनेक कार्यालयाला अक्षरशाः अवकळा आली.कार्यालयाच्या अवतीभोवती घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. काही कार्यालय जुगार्यासाठी वापरले जात आहे.