Friday, May 20, 2022
No menu items!
Homeक्राईमजिल्हा परिषद कार्यालयासमोर अपंग तरुणाची आत्महत्या, मयताने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली

जिल्हा परिषद कार्यालयासमोर अपंग तरुणाची आत्महत्या, मयताने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली


बीड (रिपोर्टर)- नगर रोडवरील जिल्हा परिषद कार्यालयासमोर एका ३५ वर्षीय अपंग युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. सदरील तरुणाने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे समजू शकले नाही मात्र आत्महत्या करण्यापुर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे सांगण्यात आले. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. या चिठ्ठीमध्ये नेमके काय आहे? हे समजू शकले नाही.


किशोर रोहिदास साळवे (वय ३५) हा अपंग तरुण नगर रोडवर असलेल्या एका नर्सरीमध्ये कामाला होता. त्याच ठिकाणी तो रात्रीच्या दरम्यान झोपत असे. त्याने आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आत्महत्या करण्यापुर्वी या तरुणाने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे सांगितले जाते. या चिठ्ठीमध्ये नेमके काय लिहिले आहे हे मात्र समजू शकले नाही. चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

सदरील तरुणाच्या आत्महत्येबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. हा तरुण अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता. या घटनेची माहिती समजताच अनेक अपंग तरुणांनी व त्याच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेतली.

Most Popular

error: Content is protected !!