Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडप्रशासनाच्या निर्णयाचा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फटका

प्रशासनाच्या निर्णयाचा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फटका

बीड (रिपार्टर):- गेल्या २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले आहेत. जिल्हा प्रशासनाने सामाजिक न्याय विभागाचे सर्व वसतिगृह कोव्हिड सेंटरमध्ये रुपांतरीत केल्या आहेत. तर बीड येथील मुलींचे वसतिगृहांचे रुपांतर कच्चे कैदी ठेवण्यासाठीच्या जेलमध्ये केले आहे. त्यामुळे जे विद्यार्थी वसतिगृहात राहतात त्यांना इतर बाहेर रुम करून राहावे लागते किंवा अनुपस्थित राहून गावी राहावे लागते. त्यामुळे जिल्हाधिकारी जगताप यांनी या बाबतची गंभीर दखल घेत सामाजिक न्याय विभागाचे सर्व वसतिगृहे खुले करावेत.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ज्या रुग्णांना कोरोना संसर्ग झालेला आहे अशा रुग्णांच्या विलगीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने सामाजिक न्याय विभागाचे सर्व वसतिगृहे ताब्यात घेऊन अशा वसतिगृहात या रुग्णांना ठेवले होते. तर बीड येथील मुलींचे वसतिगृहांचे रुपांतर जेलमध्ये केले होते. मात्र जोपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद होते तोपर्यंत प्रशासनाच्या या निर्णयाचा फटका या शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना बसला नाही मात्र गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाले आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनात टर्निंग पॉईंट ठरते. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. दोन महिन्यांपुर्वी शाळा, महाविद्यालये सुरू होऊनही जिल्हा प्रशासनाने हे वसतिगृहे खुले केलेले नाहीत. वास्तविक पाहता जिल्ह्यातील अनेक मोठमोठे मंगल कार्यालय आणि शासकीय आयटीआय या ठिकाणी कोरोना रुग्णांचे विलगीकरण कक्ष सुरू केले गेले आहेत. आज कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चाललेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेले सर्व वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात यावीत आणि त्यासोबतच यावर्षीची वसतिगृहातील प्रवेशाची यादीही तात्काळ प्रकाशीत करावी, जेणेकरून ज्यांना राहण्याच्या सुविधेअभावी आपले शिक्षण बंद करण्याची वेळ आली आहे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

Most Popular

error: Content is protected !!