जिल्हाधिकार्यांसह सीईओ माजलगाव, वडवणीतील शेतकर्यांशी साधणार संवाद
बीड (रिपोर्टर) लम्पी आजार वाढत असल्याने आज जि.प.चे सीईओ अजित पवार यांनी अधिकार्यांची तातडीची बैठक घेतली. अधिकार्यांना योग्य त्या सूचना सीईओ यांनी दिल्या. आज दुपारी जिल्हाधिकार्यांसह सीईओ माजलगाव आणि वडवणीतील शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. जिल्ह्यात आजस्थितीत 162 जनावरांना लम्पी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
जनावरांना लम्पी या आजाराने पछाडले. बीड जिल्ह्यातही अनेक जनावरांना लम्पी झाल्याचे समोर आले असून आतापर्यंत 162 जनावरे बाधीत झाले असल्याचे निष्पन्न झाले असून आज जि.प.चे सीईओ अजित पवार यांनी पशुवैद्यकीय अधिकार्यांसोबत बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात गाईंची संख्या अडीच लाख तर एकूण जनावरे साडेसात लाख इतकी आहेत. दुपारी जिल्हाधिकार्यांसह सीईओ माजलगाव आणि वडवणीतील शेतकर्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले.