बीड (रिपोर्टर) माजलगाव महावितरण कंपनीचे उपअभियंता सुहास मिसाळे यांना वीज वसुलीमध्ये अनियमितता, वीज चोरी रोखण्यात अपयश याचा ठपका ठेवत औरंगाबाद उपविभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशावरून अधिक्षक अभियंता कोळप यांनी सेवेतून निलंबीत केले आहे.
24 नोव्हेंबर 2021 रोजी औरंगाबाद उपविभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक यांनी औरंगाबाद ते माजलगाव प्रवासादरम्यान सिरसदेवी ते माजलगाव या रोडवर अनेक लोकांनी हॉटेल, रस्त्यावरच्या पाण्याच्या मोटारी, फॅब्रिकेशनची दुकानरांनी वीज चोरी केली होती. ही बाब सहव्यवस्थापकीय संचालक यांनी माजलगाव उपविभागाचे अभियंता सुहास मिसाळ यांनी गंभीरतेने घेऊन ही वीज चोरी रोखण्याचे आदेश दिले होते. मात्र मिसाळ यांनी ही वीज चोरी रोखली नसल्याचे 10 मे 2022 रोजी व्यवस्थापकीय संचालक यांनी केलेल्या दौर्यात आढळून आले. माजलगाव उपविभागाकडे 7 कोटी 16 लाखांची वीज वसुली असताना 13 एप्रिल 2022 पर्यंत त्यांनी 1 कोटी इतक्याच वीज बिलाची वसुली केली. यासह मिसाळ यांनी आपल्या कर्तव्यात अनेक प्रशासकीय बाबींमध्ये अनियमितता केल्याचा ठपका ठेवत सहव्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशावरून अधिक्षक अभियंता कोळप यांनी मिसाळ यांना सेवेतून निलंबीत केले आहे.