• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

माजलगाव नगरपालिकेत मोठा राजकीय उलटफेर; शरद पवार गटाची सरशी, सोळंके गटाला मतदारांचा धक्का

by गणेश सावंत
December 21, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


माजलगाव (बीड) | रिपोर्टर
नगरपालिका निवडणुकीपूर्वी विकासाचा गाजावाजा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांना माजलगावच्या मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे. सोळंके समर्थित उमेदवाराला थेट तिसऱ्या क्रमांकावर ढकलत मतदारांनी मोठा राजकीय उलटफेर घडवून आणला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये दिसून आलेल्या अभूतपूर्व एकीचा फायदा माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या सून महरीन शिफा बिलाल चाऊस यांना झाला असून त्यांनी तब्बल अडीच हजार मतांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले.
यापूर्वी माजलगाव नगरपालिका भाजप व शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जात होती. भाजपच्या संध्या ज्ञानेश्वर मेंडके या जातीय समीकरणात आघाडीवर असल्याचे चित्र होते. मात्र शहरात भाजपकडे ठोस नेतृत्वाचा अभाव आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे दुर्लक्ष याचा फटका भाजपला बसल्याचे निकालातून स्पष्ट झाले. प्रभाग क्रमांक चारमधून भाजपच्या तिकिटावर दीपक मेंडके निवडून आले असले तरी हा विजय त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाचा असल्याची चर्चा शहरात होती. याच प्रभागातून त्यांच्या पत्नी रेश्मा मेंडके यांनीही विजय मिळवला. मात्र एकूणच भाजप व शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने दोन्ही पक्षांचा या निवडणुकीत जवळपास सुपडा साफ झाल्याचे चित्र दिसून आले.


मागील अनेक वर्षांपासून शहराच्या विकासाचे दावे करणाऱ्या आ. प्रकाश सोळंके यांनी २०० ते ३०० कोटी रुपयांहून अधिक निधी शहरासाठी आणल्याचा दावा केला होता. मात्र या निधीतून झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होत असतानाही आमदार सोळंके यांनी यावर कधीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. विकासाच्या नावाखाली आलेला कोट्यवधींचा निधी ‘पाण्यात गेल्याचा’ आरोप करत मतदारांनी सोळंके गटाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर पाठवून आपला रोष व्यक्त केला.


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महरीन शिफा बिलाल चाऊस यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या प्रचाराची धुरा बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी समर्थपणे सांभाळली. त्याचबरोबर मोहन जगताप, नारायण डक आणि सहाल चाऊस यांनी दाखवलेल्या एकीमुळे विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला. या संघटित ताकदीच्या जोरावर सहाल चाऊस यांच्या सून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.


निवडणुकीच्या अंतिम निकालानुसार नगरसेवक संख्येत
– राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट : १०
– राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : १०
– काँग्रेस : १
– भाजप : १
– एमआयएम : १
– अपक्ष : ३
असे चित्र समोर आले आहे.
दरम्यान, या निवडणुकीत अनेक दिग्गजांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. प्रभाग क्रमांक १० मध्ये माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांचे पुतणे अभय होके पाटील, भाजप सोशल मीडिया सेलचे दत्ता महाजन, भाजप शहराध्यक्ष विनायक रत्नपारखी, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती अशोक डक यांचे पुतणे अजिंक्य डक, तसेच माजी नगराध्यक्ष सुमनबाई मुंडे यांचा पराभव झाला. तर माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांना अवघी १२७ मते मिळाल्याने त्यांना आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही.
एकूणच माजलगाव नगरपालिकेच्या या निवडणुकीने शहराच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करत ‘विकासाच्या दाव्यांपेक्षा कामाची गुणवत्ता महत्त्वाची’ असा स्पष्ट संदेश दिला आहे.

Previous Post

परळीत धनु भाऊ – पंकजाताईंचा एकहाती विजय…!माय बाप जनतेचे अनेक अनेक आभार – धनंजय मुंडे

Next Post

बीड नगरपालिकेत ऐतिहासिक उलथापालथ; क्षीरसागर घराण्याची सत्ता संपुष्टात, प्रेमलता पारवे नगराध्यक्ष

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post

बीड नगरपालिकेत ऐतिहासिक उलथापालथ; क्षीरसागर घराण्याची सत्ता संपुष्टात, प्रेमलता पारवे नगराध्यक्ष

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?