बीड (रिपोर्टर) नुकतीच केंद्र आणि राज्य सरकारने बंदी घातलेल्या पीएफआयचे बीड शहरातील कार्यालय महसूल विभागाने पोलिस संरक्षणामध्ये पहाटे 3 वाजता सील केले.
गेल्या आठ दिवसापूर्वी देशातील पीएफआय संघटनेच्या पदाधिकार्यांची धरपकड सुरू आहे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घातली आहे. बीड शहरातही जुना बाजार भागात कादर पाशा मस्जिदीजवळ असलेल्या पीएफआय कार्यालयाला उपविभागीय अधिकारी (महसूल) नामदेव टिळेकर, तहसिलदार सुहास हजारे, महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी पोलिस निरीक्षक रवि सानप यांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यालय सील केले आहे. या कार्यालयातून संघटेनेचे कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. दोन दिवसापूर्वीच पोलिसांनी बीड शहरातील या संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष फेरोज मोमीन आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष कामरान यांना ताब्यात घेतले. या दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रात्री 3 वाजता हि कारवाई मोठ्या पोलिस बंदोबस्तात महसूल विभागाने केली.