वडवणी (रिपोर्टर):- बीडकडून सिरसाळाकडे जाणारी स्विफ्ट गाडी वडवणी येथील निवडणुक विभागाच्या निगराणी पथकाने तपासणी केली त्यामध्ये आयबी कंपनीचे दारुचे बाँक्स आढळून आले असल्याने गाडी ताब्यात घेत दोन जाणाविरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड लोकसभा 2024 ची धामधूम जोरात चालू असून निवडणूक आयोग ही जोमात कामाला लागले आहे. कुठेही आचारसहीतेचा भंग होऊ नये यासाठी निवडणुक आयोगाने एफएसटी, एसएससी,व्ही एस टी,व्ही व्ही टी आदी पथकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यातीलच छत्रपती शिवाजी महाराज चौक वडवणी येथे कार्यरत असलेले एसएसटी निगराणी पथकाने काल सायं 6 वाजण्याच्या दरम्यान बीड येथुन सिरसाळाकडे जात असलेल्या गाडी क्रमांक एम एच 14 एम के 8559 या गाडीमध्ये विनापरवाना आयबी कंपनीच्या 96 दारूचे काचेच्या बॉटल त्याची किमत 19 हजार दोनशे हजार रु. दारु विनापरवाना वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये गाडी चालक शेख इमरान शेख अली ( रा. सिरसाळा) उद्धव उत्तमराव काळे (रा. पौळप्रिंप्री ता परळी जि बीड ) यांच्यावर वडवणी पोलिस स्टेशनला कलम 65 ई दारुबंदी अधिनियम कलम 183 मोटार कायद्यासह अधिनियम नियमाने गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी वडवणी पोलिस स्टेशनचे एपीआय अमन सिरसट, पथक प्रमुख म्हणुन आर. एस. साठे, साहायक व्ही. जी. वाघमारे, सहायक पवार वाय. बी. पोलिस कर्मचारी विठ्ठल गिते, पोकॉ खरात, गिते, व्हीडीओग्राफर शुभम गोंडे आदी उपस्थित होते. पुढील तपार वडवणी पोलीस स्टेशनचे एपीआय अमन सिरसठ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ.वाघमारे हे करत आहेत.