गणेश जाधव । बीड
बीड जिल्ह्यात वाढत्या सोनसाखळीचे बीड पोलिसांसमोर मोठे आव्हाण होते. ते आव्हाण स्थानिक गुन्हे शाखेने स्विकारुन प्रभारी पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई केली आहे. बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि परराज्यात धुमाकूळ घालणाऱ्या सोनसाखळी टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने आज पर्दापास केला असून पुणे येथून टोळीच्या मोरख्यासह चार जण ताब्यात घेतले आहेत.
बीड जिल्ह्यात वाढत्या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या काही महिन्यात सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत एकटेच मैदान गाजवत होते. आज प्रभारी पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरिक्षक सतिष वाघ आणि त्यांच्या टिमने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रासह परराज्यात धुमाकुळे घालणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या टोळीचा पर्दाफास केला आहे. काल त्यांनी पुणे येथून मोरक्यासह चार जण ताब्यात घेतले आहेत. यासाठी स्थानिक गुन्हे शाखा गेल्या 23 तारखेपासून त्यांच्यावर रात्रन्दिवस नजर ठेवून होती. पोलिस आपल्या मागावर असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने या टोळीने पोलिसांना सहा दिवस गुंगारा दिला मात्र अखरे त्यांच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
बीडमधील पाच गुन्हे उघड
पकडलेल्या टोळीने बीड शहरात चार अन् अंबाजोगाईमध्ये एक गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सध्या त्यांनी पुणे, ठाणे, उल्हासनगर, गोवा आणि इतर राज्यात 27 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
बीड पोलिसांनी अभिमानास्पद कारवाई केली आहे. पकडलेल्या टोळीवर कडक कारवाई करु की, पुन्हा बीडमध्ये पाय ठेवण्याची त्यांची हिंमत होणार नाही. सध्या एकूण 27 गुन्हे उघड झाले असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
-सुनिल लांजेवार
प्रभारी पोलिस अधिक्षक