बीड (रिपोर्टर): सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. पोलिसांना विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी जावे लागते. परळी आणि पाटोदा येथील पोलिसांना वर्धा जिल्ह्यात बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी हजर राहिले नसल्याने त्यांच्या विरोधात जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कारवाई केली. दोन्ही पोलीस कर्मचार्यांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय दशरथ गांगुर्डे हे पाटोदा पोलीस ठाण्यात तर हरीदास शामराव गिते हे परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या दोघांना वर्धा जिल्ह्यामध्ये बंदोबस्ताला पाठविण्यात आले होते मात्र दोघेही बंदोबस्तासाठी हजर राहीले नसल्याने दोघांविरोधात पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कारवाई केली. बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.