Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeबीडबनसारोळा येथील सभागृहासाठी धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दाची पूर्ती! १५ लाख रुपयांच्या...

बनसारोळा येथील सभागृहासाठी धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दाची पूर्ती! १५ लाख रुपयांच्या सभागृहाचे भूमिपूजन संपन्न.

यासाठी नाथऱ्याचा मंजूर निधी धनुभाऊंनी बनसारोळ्याला वळवला – अजय मुंडे
बनसारोळा/केज

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या बनसारोळा ता. केज येथील बनेश्वर मंदिराच्या सभागृहाच्या १५ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते (दि. १० फेब्रुवारी) संपन्न झाले. गावातील अखंड हरिनाम सप्ताहास भेट देण्यासाठी गावात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी गावकऱ्यांना दिलेल्या शब्दाची या माध्यमातून पूर्तता केली आहे. 
या कार्यक्रमास जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, जि. प. उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, जि. प. गटनेते अजयजी मुंडे यांसह गावातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. गावातील प्रसिद्ध बनेश्वर देवस्थानाच्या सभामंडपसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी गावकऱ्यांनी ना. मुंडेंचे आभार व्यक्त केले. 
बनसारोळा गावचे भूमिपुत्र ना. धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक श्री. खंडू गोरे यांनी गावच्या विकासकामांसाठी पुढाकार घेतला असून, जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करताना त्यांच्या माध्यमातून गावाला आणी परिसराला विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही असा विश्वास मा बजरंगबप्पा सोनवणे यांनी व्यक्त केला ..!
गावकऱ्यांना दिलेल्या शब्दखातर ना. धनंजय मुंडे यांनी नाथरा या त्यांच्या स्वतःच्या गावासाठी आलेला विकासनिधी वळवून तो बनसारोळा गावास प्राप्त करून दिला. भविष्यातही ना. मुंडेंच्या माध्यमातून विधायक विकास कामे हाती घेण्यात येतील असे यावेळी बोलताना श्री. अजय मुंडे म्हणाले.कार्यक्रमाच्या सरपंच निता धायगुडे ,युवराज गोरे ,भागवतदादा गोरे ,युवराज काकडे ,शिवाजी पवार ,बालासाहेब काकडे ,समाधान महाराज गोरे कौडगावचे सरपंच विष्णु चाटे, गंगाराम धायगुडे,बोरीसावरगावचे सरपंच सुनिल देशमुख,हाबु गोरे ,संजय काळे,पृथ्वीराज गोरे ,कृष्णा गोरे ,संतोष गोरे ,दिलीप माळी ,व देवस्थान कमिटी व ग्रामस्थ उपस्थित होते ..!

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!