बीड (रिपोर्टर)ः- शहरातील नगर रोड ते पालवन चौक या धानोरा रोडवर मोठं मोठे खड्डे पडले असून हे खड्डे बुजवण्यासाठी नागरीकांनी वेळोवेळी निवेनद देत उपोषण केल्याने हे खड्डे बुजवण्यास सुरूवात केली होती. मात्र आर्ध्या रस्त्यावरील खड्डे बुजवल्यानंतर बाकीचे खड्डे गेल्या पंधरा दिवसापासून बुजवायला मुहूर्त मिळत नसल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नगर रोड ते पालवन चौक रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात धुर उडत आहेत. या धुळीमुळे येथील व्यवसायीकांचे मोठे नुकसान होत आहे. खड्डयामुळे वाहनांचा खळखळाट झाला असून नागरीकांना मणक्यांचा आजार होत आहे. हे खड्डे बुजवावे यासाठी नागरीकांनी अधिकारी, पुढार्यांना वेळोवेळी निवेदने दिल्याने गेल्या पंधरा दिवसापूर्वी येथील खड्डे बुजवायला सुरूवात झाली होती. नगर रोडपासून भगवान विद्यालयापर्यंत खड्डे बुजवले मात्र तेथून पुढे पालवन चौकापर्यंंत मोठ मोठे खड्डे पडले असून ते खड्डे बुजवण्यासाठी कधी मुहूर्त सापडणार असा प्रश्न नागरीकांतून विचारला जात आहे.