Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईसरपंच असावा तर असा..! तळेवाडीचे नवनिर्वाचित सरपंच बाळु यमगर यांनी स्वतः विजेच्या...

सरपंच असावा तर असा..! तळेवाडीचे नवनिर्वाचित सरपंच बाळु यमगर यांनी स्वतः विजेच्या खांबावर चढून गावचा विद्युत पुरवठा केला सुरळीत

सरपंच असावा तर असा..!
निवडीच्या तिसर्‍याच दिवशी तळेवाडीचे नवनिर्वाचित
सरपंच बाळु यमगर यांनी स्वतः विजेच्या खांबावर चढून
दुरुस्ती करत गावचा विद्युत पुरवठा केला सुरळीत

गेवराई । भागवत जाधव
एकदा का निवडणूक झाली आणि सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यात पडली की या पदाचा तोरा मिरवणार्‍यांची आपल्या कडे कमी माही मात्र गावच्या सरपंच पदी निवड झाल्यानंतर तिसर्‍याच दिवशी स्वतः विजेच्या खांबावर चढुन आठ दिवसापासून अंधारात असलेल्या गावच्या विजेचा प्रश्न मार्गी लावत गावाप्रति काम करण्याची तळमळ व सरपंच पदाचे कर्तव्य बजावत आपल्या कामाची चुणूक दाखवून दिल्याने तळेवाडी येथील नवनिर्वाचित सरपंच बाळू यमगर यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे.
तालुक्यातील तळेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत 40 वर्षानंतर या निवडणूक सत्ता परिवर्तन झाले आहे. या निवडणुकीत ग्रामस्थांनी बाळराजे दादा ग्रामविकास पॅनलच्या पाच उमेदवारांना भरघोस मताने निवडून देत पॅनल प्रमुख युवा नेते नंदू गरड यांच्यावर विश्वास दाखवत ही ग्रामपंचायत आ.लक्ष्मण पवार यांच्या ताब्यात दिली. दरम्यान येथील सरपंच पद हे ओबीसी साठी राखीव असल्याने येथील वैशाली बाळू यमगर यांची निवड करण्यात आली तर उपसरपंच पदी पॅनलप्रमुख नंदू गरड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यानंतर यांनी तात्काळ गावातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या कामाला सुरुवात केली. यावेळी अनेक दिवसांपासून विजेच्या तारा तुटल्याने गावचा विद्युत पुरवठा बंद होता याकडे महावितरण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नवनिर्वाचित सरपंच बाळू यमगर व उपसरपंच नंदू गरड यांनी गावातील काही तरुणांना सोबत घेत या तारा जोडणीचे काम हाती घेतले यावेळी आपल्या सरपंच पदाबाबत मनात कुठलाच अविर्भाव ना मिरवता स्वतः विजेच्या खांबावर चढुन त्यांनी गावातील विद्युत पुरवठा सुरळीत केला. यावेळी त्यांना राजेंद्र गोंजारे, सुखदेव गरड, राम येवले,आकाश थोटे, लक्ष्मण माने, अक्षय थोटे, विजय तुपे, रावसाहेब यादव, सचिन जाधव, संतोष गोंजारे या सर्वांनी विजेचे तारा जोडण्याकरिता सहकार्य केले असून बाळू यमगर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर येणार्‍या काळात आम्ही आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली गावातील विविध विकास कामे करून एक आदर्शगाव करण्याच्या उद्देशाने आमची वाटचाल सुरू असल्याचे नंदुशेठ गरड यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले.

Most Popular

error: Content is protected !!