Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडवीज बील भरूनही डीपी सुरू होईना

वीज बील भरूनही डीपी सुरू होईना

वीज मंडळाचा तुघलकी कारभार; ज्यांनी कोटेशन भरले त्यांचेही कनेक्शन कट केले
कुक्कडगाव (रिपोर्टर):- वीज वितरण कंपनीने थकीत बिलासाठी वीज तोडण्याची मोहीम हाती घेतली. अचानक वीज तोडणीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होऊ लागले. कुक्कडगाव येथील शेतकर्‍यांनी वीजेचे बील भरले तरीही त्यांचा तात्काळ डीपी सुरू करण्यात आलेला नाही. विजेअभावी अभावी खरीप पिके सुकून जावू लागली. ज्यांनी विजेचे नवीन कोटेशन भरले होते त्यांचे देखील वीज मंडळाच्या अधिकार्‍यांनी कनेक्शन कट केले. वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या अवमेळामुळे शेतकर्‍यांत संताप व्यक्त केला जात आहे. वीज मंडळाचा कारभार तुघलकी असल्याचे यावरून दिसून येऊ लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून थकित वीज बिलासाठी वीज मंडळाने कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली. या अचानक कनेक्शन तोडणीमुळे शतेकर्‍यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. कुक्कडगाव येथील बहुतांश शेतकर्‍यांनी वीजेचे बील भरले. गावातील डीपी खराब झाला होता. हा डीपी खासगी तत्वावर पैसे खर्च करून भरून आणण्यात आला मात्र तरी देखील तो अद्यापही सुरू करण्यात आलेला नाही. वीज मंडळाचे पथक गावात आले होते. या मंडळाने कुठलीही विचारपूस न करता आणि कुणी बील भरले किवा नाही याची माहिती न घेता ज्या शेतकर्‍यांनी नवीन कोटेशन घेतले अशा शेतकर्‍यांचे देखील विज कनेक्शन तोडल्याने वीज मंडळाच्या अधिकार्‍यातच अवमेळ नसल्याचे दिसून येत आहे. वीज मंडळाने आपला आधी कारभार सुधारावा व नंतर शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडावे अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यातून व्यक्त केल्या जात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!