Saturday, October 16, 2021
No menu items!
HomeUncategorizedबीड, अंबाजोगाई, गेवराईत संसर्ग वाढला; जिल्ह्यात ५३ पॉझिटिव्ह

बीड, अंबाजोगाई, गेवराईत संसर्ग वाढला; जिल्ह्यात ५३ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात पुन्हा कोरोना वाढू लागला असून आज आलेल्या अहवालात बीड, अंबाजोगाई आणि गेवराई तालुक्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह आढळून आल्याने या तीन तालुक्यात पुन्हा कोरोनाने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. आज नव्या ५३ रुग्णांची भर पडली.
आरोग्य विभागाने काल ८३७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये ५३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर ७८४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्हमध्ये बीड १८, अंबाजोगाई १४, गेवराई ५, आष्टी ४, माजलगाव २, शिरूर ४, वडवणी १ तर परळी तालुक्यातही पाच रुग्ण आढळून आले आहेत.

मास्क न वापरणार्‍यांविरोधात कारवाईचा फायदा
नागरिक मास्क वापरू लागले
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले जात होते मात्र काही लोक या आवाहनाकडे दुर्लक्ष करत होते. गेल्या तीन-चार दिवसांपुर्वी जिल्हाभरात मास्क न वापरणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केल्यापासून लोक कंपल्सरी प्रवास करत असताना मास्क वापरत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

Most Popular

error: Content is protected !!