Saturday, October 16, 2021
No menu items!
HomeUncategorizedवाळू उपसा करणार्‍या जेसीबीसह चार ट्रॅक्टर जप्त एसपींच्या विशेष पथकाची पिंपळनेर हद्दी...

वाळू उपसा करणार्‍या जेसीबीसह चार ट्रॅक्टर जप्त एसपींच्या विशेष पथकाची पिंपळनेर हद्दी कारवाई


अवैधरित्या राखेची वाहतूक करणार्‍या ६ हायवा पकडले
बीड/परळी (रिपोर्टर):- वाळू माफियांविरोधात पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी विशेष मोहीम हाती घेतली काल रात्री पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव येथील सिंदफणा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करणार्‍या एका जेसीबीसह चार ट्रॅक्टर जप्त केले. दरम्यान अवैधरित्या राखेची वाहतूक करणार्‍या सहा हायवा परळी ग्रामीण पोलिसांनी पकडून त्या जप्त केल्या आहेत.
पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंदफणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती विशेष पथकाचे एपीआय विलास हजारे यांना मिळताच त्यांनी काल रात्री सिंदफणा नदी पात्रात आपल्या पथकासह धाड टाकली असता तेथे एक जेसीबी आणि चार ट्रॅक्टर असा एकूण ५६ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी ते ताब्यात घेऊन पिंपळनेर पोलिस ठाण्यात दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या वेळी आरोपी प्रभाकर परमेश्वर देवडकर (वय २८, रा. आडगाव), बाळू श्रीधर बनगर (वय ३२, रा. आडगाव) या दोघांना ताब्यात घेतले असून अंगद लक्ष्मण परींदकर (रा. आडगाव) हा फरार चौथा अशोक आबुज (रा. रंजेगाव) हे दोघे फरार झाले आहेत. परळी शहरातून अवैधरित्या राखेची वाहतूक होत असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर रात्री पोलिसांनी सहा गाड्या पकडल्या. सदरील ही कारवाई परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पुर्भे, नवघरे, मिरगे, मुंडे, गिते, जाधव, त्रिमंगले, बोडखे, घुगे, गोपाळ घरे, शेप यांनी केली. सदरील या गाड्या पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आल्या आहेत.

जप्त केलेली वाळू व गाड्या
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात

बीड तालुक्यासह जिल्हाभरात वाळू माफियांनी उच्छाद् मांडलेला आहे. या वाळू माफियाविरोधात महसूल विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या तीन-चार दिवसात वाळू माफियांविरोधात कारवाई करून वाळूसह हायवा गाड्या जप्त केल्या. जप्त केलेली वाळू हायवा, ट्रॅक्टर आणि जेसीबी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभ्या करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!