• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अग्रलेख- धर्मांध मुद्दे अन् राजकारणाचे थडगे

by Beed Reporter
October 30, 2022
Reading Time: 1 min read
0
विशेष संपादकीय…
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत
मो. नं. 9422742810
तुम्ही भ्रष्टाचार करणं बंद केलं का? या प्रश्‍नाचं उत्तर जसं अवघड जागेचं दुखणं असंच येतं. म्हणजेच भ्रष्टाचार करणं बंद केलं म्हणावं तर या आधी भ्रष्टाचार करत होते असं निष्पन्न होतं आणि नाही असं उत्तर दिलं तर आता भ्रष्टाचार करत आहे असे उघड होते अशीच काहीशी गुगली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा विरोधात टाकली. गेल्या आठ दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांना भारतीय चलनावर (नोटावर) लक्ष्मी आणि श्री गणपतीचा फोटो असायला हवा असे वाटू लागले. उपस्थितांना त्यांनी याबाबत विचारलंही तेव्हा उपस्थितांनीही लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोबाबत साद घातली. सत्तेत आल्यापासून भाजपाने जात, धर्म, देव यांना आपली जहाँगिरी समजून ज्या पद्धतीने देशात धार्मिक आणि धर्मांध उन्माद सुरू केला आणि आम्हीच हिंदूंचे व हिंदुत्वाचे कैवारी असल्याचे दाखवून उर बडवून घेतला. त्या उरावर अरविंद केजरीवाल यांनी थेट गणपतीलाच तांडव करण्यास या मागणीतून भाग पाडले. खरं पाहिलं तर भारतीय चलनावर कोणाचा फोटो पाहिजे यावर चर्चा होण्यापेक्षा आज मितीला देशातील लोकांना नेमके काय हवेय यावर चर्चा व्हायला हवी. परंतू निवडणूका आल्या की जात,पात, धर्म, पंत समोर आणायचे. माणसा माणसात धर्माचे आणि जातीचे विष पेरायचे, विष पुरुष होत आपली सत्तेची पोळी भाजून घ्यायची हे जे देशात राज्यकर्त्यांनी धोरण आखले आहे ते देशाच्या भविष्यासाठी घातकच म्हणावे लागेल. सातत्याने

धार्मिक मुद्दे
समोर करून राज्यकर्त्यांना नेतृत्व करणार्‍यांना नेमके साध्य काय करायचेय? याचे उत्तर सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हे येत असतांना आम्ही मात्र बघ्याची भुमिका घेतो हेही त्यात सर्वात मोठे दुर्दैवंच. खरं तर लोकांनी लोकशाहीच्या राज्यात जो लोकांच्या मुलभूत प्रश्‍नांकडे लक्ष देतो त्याला नेता मानून, त्याचं नेतृत्व स्विकारून, त्याच्या पाठीमागे उभा राहायला हवे मात्र नाही. इथे जात आणि धर्माला अधिक महत्त्वं दिलं जातं. राजकारण आलं की प्रभु रामाचं स्मरण केलं जातं. आता तर गणपती आणि लक्ष्मीलाही राजकीय आखाड्यात आणून केजरीवाल यांनीही आम्हीही भाजपापेक्षा कमी नाहीत हे दाखवून दिलं. धार्मिक मुद्दे जाहीर चव्हाट्यावर आणण्याची ही आज पहिली वेळ नाही. कधी राहूल गांधींचं जानवं समोर येतं. अयोध्या मंदिर आणि प्रभु राम तर भाजपाने जणू प्रचारासाठीच ठेवले. आता महाराष्ट्रात प्रभु राम भक्त हनुमानानांही राजकारण्यांनी राजकीय आखाड्यात आणून सोडले. एक मात्र खरे ज्या भारतीय जनता पार्टीला धर्म, जात आणि देवाच्या नावावर राजकारण करता येतं आणि त्यात यश निर्माण करून स्वत:ची पोळी भाजून घेण्यात येते येथेच अरविंद केजरीवाल यांनी

तेल लावलेला पहिलवान
सारखे वागून भाजपाच्या हाती लागणार नाही असे दाखवून दिले. समजा अरविंद केजरीवाल यांनी गणपती आणि महालक्ष्मी यांच्या नोटावरील फोटोबाबतची मागणी भाजपाने मान्य केली तर त्याचे श्रेय हे आपचे अरविंद केजरीवाल यांच्याकडे जाईल. हिंदुत्व आमची जहाँगिरी समजणार्‍या भाजपाला हे परवडणार नाही आणि या मागणीला विरोध केला तर अरविंद केजरीवाल आणि आप भाजपाच्या बेगड्या हिंदुत्वावर आक्रमक हल्लाबोल करतील. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांची ही मागणी भाजपाला कोंडीत पकडणारी आहे. नोटावर कोणाचं चित्र हवं याबाबत याच्या आधीही अनेकवेळा प्रयत्न झाले. अरविंद केजरीवालांच्या मागणीनंतर काँग्रेसने थेट भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी केली आणि या मागणीत चुक ती काहीच नाही. कारण रिझर्व्ह बँक निर्माण करण्यामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा वाटा होता. यापेक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच या बँकेची निर्मिती झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने हिंदुत्व आणि इतर विषय हाताळण्याची हातोटी हाती घेतली ती भारतीय जनता पार्टीला डोकेदुखी ठरणारी असली तरी अशा विषयातून देशाचे आणि देशातील जनतेचे भले ते काय होते? हा प्रश्‍न विचारावाच लागेल. राज्यकर्त्यांनी आणि सत्ताकर्‍यांनी धार्मिक मुद्दे उपस्थित करून राजकारणाचे थडगे बांधण्यापेक्षा

लोकांच्या मुलभूत गरजा
दृष्टीक्षेपास आणून त्या पुर्णत्वास कशा नेता येतील याकडे अधिक लक्ष दिले गेले तर ते लोकहिताचे आणि त्यांच्या मते दैवी मताचे काम होईल. कुठल्याही धर्माच्या अथवा जातीच्या इश्‍वराला असे वाटत नाही की आपला भक्त हा दुबळा असावा, दरिद्री असावा, भिकारी असावा. जर मग देवांनाच आपल्या भक्ताबाबत असे वाटत नसेल तर आजकाल त्यांचे पुजारी होवू पाहणार्‍या राजकारणातील सत्ताधार्‍यांना, नेतृत्व करू पाहणार्‍यांना सर्वसामान्य लोकांची किव का येत नाही? देशात अनेक प्रश्‍न आऽ वासून उभा आहेत. रुपयाच्या घसरणीपासून महागाईच्या चढत्या आलेखापर्यंत चिंतेचे वातावरण आहे. बेरोजगारांचा प्रश्‍न एखाद्या भस्मासुरासारखा वाढत चालला आहे. अन्न धान्याचा तुटवडा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, भारतातील शैक्षणिक धोरण, आरोग्याबाबतचे प्रश्‍न ग्रामीण नांगरी इलाक्यातील रस्त्याचे प्रश्‍न, शेतासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी वीज उपलब्ध नाही तो प्रश्‍न परंतू हे प्रश्‍न सोडवण्यापेक्षा धर्म, जात आणि देवावर बोलून आजचे राजकारणी ज्या पद्धतीने समाज व्यवस्थेला धार्मिक द्वेषाच्या विषात डायव्हर्ड करून जी विषवल्ली उभी करतात ती संतापजनकच. म्हणूनच

देव, देश आणि धर्म
साठी प्राण आपले नक्कीच लावू परंतू ते घरामध्ये. लोकांनी लोकांसाठी, लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या संविधानाच्या ग्रंथावर आजचे सर्वकाही होते. देश त्यावर चालतो. श्रद्धा ही नक्की असायला हवी मग ती देव असो, देश असो अथवा धर्म असो. ज्या वेळेस धर्माचा प्रश्‍न येतो त्यावेळेस स्वत:च्या धर्माचा नक्की गर्व करावा परंतू इतरांच्या धर्माचा अनादर करू नये हेच आम्हाला गितेने शिकविले, कुराणाने शिकविले, बायबलने शिकविले. खरं तर या तीन धर्मग्रंथाचा एक एक वाक्यातला सार पाहितला आणि तो सार देशाच्या प्रत्येक माणसाने अनुग्रहीत केला तर धर्माच्या मुद्यावर राजकारणाचे थडगे हे राज्यकर्ते बांधूच शकणार नाहीत. कारण गिता कहेती है त्याग करो! कुराण कहेता है यकीन करो! बायबल कहेता है प्यार करो! जीथं त्यागाची वृत्ती असते, जिथे विश्‍वास असतो, जिथे प्रेम असते तिथे द्वेषाची विषवल्ली उगवूच शकत नाही. त्यामुळे नोटावर काय असण्यापेक्षा देशातल्या लोकांच्या पोटाचे काय? हे पाहितले तर अधिक बरे होईल. नोटावरच्या फोटोने राज्यातली बेरोजगारी, भूकमारी संपणार नाही. शिक्षण, आरोग्य याचे प्रश्‍न सुटणार नाहीत, शेतकर्‍याच्या आत्महत्या थांबणार नाहीत हे सर्वश्रुत असताना राज्यकर्ते निवडणूका आल्या की अशा धार्मिक, भावनिक घटनांना अनन्य साधारण महत्व देत वड्याचं तेल वांग्यावर घेवून जातात ते देशहिताचे आणि लोकहिताचे नक्कीच नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी भलेही भाजपाला कोंडीत पकडण्याइरादे तुम्ही आता भ्रष्टाचार करणं बंद केलंय का? अशा आशयाचा सवाल श्री लक्ष्मी आणि श्री गणपती यांना पुढे करून विचारला असला तरी यातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न ते प्रश्‍नच असणार आहेत.

Previous Post

शिंदे-फडणवीस कोणाचे मिंदे?, नागपुरात होणारा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

Next Post

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
एकनाथ शिंदेंना ठाकरे सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली होती

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?