Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोना ब्रेकिंग -जिल्हातील शिवालये महाशिवरात्री दिवशी बंद परळी येथील महाशिवरात्री यात्रामहोत्सव...

कोरोना ब्रेकिंग -जिल्हातील शिवालये महाशिवरात्री दिवशी बंद परळी येथील महाशिवरात्री यात्रामहोत्सव रद्द


बीड (रिपोर्टर): जिल्हा भरात वाढत चाललेल्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने आता कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून काल आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी महाशिवरात्रीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शिवालय महाशिवरात्रीच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सव रद्द करून 8 मार्च ते 16 मार्च पर्यंत प्रभू वैद्यनाथाचं मंदिर पुर्णत: बंद केलं आहे.


बीड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून रोज कोरोना बाधीत रुग्णांची वाढ होत आहे, आज जिल्ह्यात तब्बल 108 कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून जिल्हा प्रशासन गांभिर्यपूर्वक पार्वूक पाऊल उचलत असतांना दिसून येत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज एका आदेशाद्वारे महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शिवालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने परळी वैद्यनाथ येथे महाशिवरात्री यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असून 8 मार्च ते 16 मार्च दरम्यान प्रभू वैद्यनाथाचं मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. मात्र सदरील कालावधीमध्ये प्रभूवैद्यनाथाच्या प्रथेनुसार पुजा व इतर बाबी या पुजारी व विश्‍वस्त यांना कोरोना विषयक नियमांचे पालन करून परवानगी असणार आहे. बीड जिल्ह्यात शिवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्सव होतात. कंकालेश्‍वर, कपीलधार, चाकरवाडी, परळी, नारायणगड यासह आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येतात. मात्र या वेळेस कोरोनाच्या अनुषंगाने मंदिरे बंद असणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!