• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

यात्रा रोखून दाखवा, गांधींचे भाजपाला आव्हान; भाजपाचे नेते शेतकर्‍यांवर काही बोलत नाहीत

by Beed Reporter
November 17, 2022
Reading Time: 1 min read
0
यात्रा रोखून दाखवा, गांधींचे भाजपाला आव्हान; भाजपाचे नेते शेतकर्‍यांवर काही बोलत नाहीत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अकोला (रिपोर्टर) भाजपाचे नेते शेतकर्‍यांवर काहीच बोलत नाहीत, देशातला शेतकरी अडचणीत आहे. देशात महागाई आहे, रोजगार नाहीत, शेतकर्‍यांना दिलासा मिळत नाही, अशा गंभीर परिस्थितीत केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून सातत्याने केला जातो. भारत जोडो यात्रावर आम्ही निघालो आहोत. अशा स्थितीत भारत जोडो यात्रेतून देशाचे नुकसान होत असेल तर त्यांनी भारत जोडो यात्रा रोखून दाखवावी, असे आव्हान राहुल गांधी यांनी भाजपाला दिले.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे यांनी केली आहे. शेवाळे यांच्या याच मागणीवर काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी. प्रत्येकाने आपापले मत मांडावे. सरकारला ही यात्रा रोखायची असेल, तर त्यांनी तो प्रयत्न करावा, असे राहुल गांधी म्हणाले. ते आज (17 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.
या लढाईला अगोदर समजून घ्यावे लागेल. लोकशाहीत एक पक्ष दुसर्‍या पक्षाशी लढत असतो. या युद्धात देशातील इतर संस्था पारदर्शकता निर्माण करतात. मात्र आता ही लढाई फक्त दोन पक्षांत नाहीये. विरोधकांचे माध्यमांवर नियंत्रण नाही. मात्र भाजपाचे माध्यमांवर नियंत्रण आहे. वेगवेगळ्या संस्थावरही भाजपाचे नियंत्रण आहे. ते न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकतात. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कमी पडतोय, हे मत चुकीचे आहे. हा वरवरचा समज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सावरकरांच्या मुद्यावरून महाराष्ट्रात विरोधकांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज राहुल गांधी पत्रकारांसमोर आले. अकोल्यात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाच्या व्यवस्थेवर आणि कार्यपद्धतीवर सडकावून टिका केली. याच पत्रकार परिषदेत त्यांनी ‘सावरकरांचा माफीनामा’ वाचून दाखवला. त्यावर सावरकरांनी सही केल्याचेही त्यांनी म्हटले. पुढे बोलताना एका प्रश्‍नावर राहुल गांधी म्हणाले, पैशाचं आमिष देऊन विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत आहे. 50 कोटी रुपये देऊन आमदार खरेदी केले जात आहेत. सध्या सर्वांचं पोट भरणारा शेतकरी संकटात आहे, देशात शेतकर्‍यांच्या अनेक समस्या असून विदर्भातील शेतकरी समस्येत असताना त्यावेळी आमच्या सरकारने मदत केली होती. हे सरकार शेतकर्‍यांकडे ढुंकूनही बघत नाही. ही यात्रा कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत जाणार असल्याचे राहुल गांधींनी सांगून सध्या देशापुढे दोन मोठ्या समस्या आहेत, देशात युवकांना रोजगार मिळत नाही. शेतकर्‍यांना कुठलाही दिलासा नाही. शेतकरी वेळेवर पीक विमा भरतात मात्र त्यांना पैसे मिळत नसल्याचे गांधी यांनी या वेळी म्हटले. भारत जोडो यात्रा रोखण्याबाबत वक्तव्य झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा रोखून दाखवावी, असे खुले आव्हान भाजपाला दिले. महात्मा गांधींबरोबर आपली तुलना करू नका, असेही ते या वेळी म्हणाले. सत्ताधार्‍यांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. या वेळी प्रसार माध्यमांनी त्यांना मराठीतून बोलण्याचा आग्रह केला. त्यांनी तसा प्रयत्नही केला. या पत्रकार परिषदेला त्यांच्या सोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

पण स्वातंत्र्यलढ्यात तुमचे कोण होते, उद्धव ठाकरेंचा
भाजपला सवाल; म्हणाले – तुमचीही कुंडली काढा

राहुल गांधी यांचे सावरकरांबद्दलचे वक्तव्य चूकच आहे. त्यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र, आमची भूमिका विचारणारे तुम्ही कोण. तुमचीही कुंडली काढा की, स्वातंत्र्यलढ्यात तुमचे कोण होते, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. आपली हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

Previous Post

जखमी जवळ सापडलेल्या गाठोड्यात काय? काही वेळ पोलिसांची उडाली धांदल; गाठोडं शवविच्छेदनासाठी नेलं अन् निघाले…

Next Post

प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानोबा माऊली लटपटे यांच्या पार्थीदेहावर अंत्यसंस्कार

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानोबा माऊली लटपटे यांच्या पार्थीदेहावर अंत्यसंस्कार

प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानोबा माऊली लटपटे यांच्या पार्थीदेहावर अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?