Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeक्राईमअवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा पकडले चालक-मालकांवर गुन्हे दाखल

अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा पकडले चालक-मालकांवर गुन्हे दाखल

गेवराई (रिपोर्टर):- गोदावरी नदी पात्रातून वाळु उपसा करून त्याची अवैध वाहतूक करणारे दोन हायवा एसपींच्या विशेष पथकाने रात्री उमापूर फाट्याजवळ पकडले असून गेवराई पोलीसात चालक-मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोदावरी नदी पात्रातून सर्रासपणे अवैध वाळुचा उपसा होत आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथून काल रात्री दोन हायवा वाळु घेऊन बीडच्या दिशेने येत असताना उमापूर फाट्याजवळील बाग पिंपळगाव शिवारात एसपींच्या विशेष पथकाने त्यांना पकडून गेवराई पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी हायवा चालक-मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या दोन हायवांमध्ये १३ ब्रास वाळू व ४८ लाखांचे दोन हायवा आहेत. ही कारवाई एसपींच्या विशेष पथकातील पथकप्रमुख विलास हजारे यांनी केल.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!