Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; २२ दिवसात २५ मृत्यू ४ हजारापर्यंत रुग्णही सापडले

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; २२ दिवसात २५ मृत्यू ४ हजारापर्यंत रुग्णही सापडले

बीड (रिपोर्टर):- गेल्या महिन्याभराच्या कालखंडात बीड जिल्ह्यात कोरोनाने उच्छाद् मांडला असून चालू महिन्याच्या २२ दिवसांच्या कालखंडात जिल्ह्यात तब्बल ३ हजार ८०० पेक्षा जास्त कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहे तर २५ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूणच जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वसामान्य नागरिकांकडून कोरोनाला हद्दपार करण्याबाबत ज्या उपाययोजना आणि नियमावली शासन-प्रशासनाकडून दिली आहे तिचे पालन होत नसल्याचे दिसून येते.
गेल्या महिन्याच्या २८ फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यात कोरोनाचे ६७८ बळी होते. काल २२ मार्च रोजी हिच बळींची संख्या ६०३ वर जावून पोहचली आहे. गेल्या २२ दिवसांच्या कालखंडात जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये तब्बल २५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून या २२ दिवसांच्या कालखंडात रोज वाढणारे रुग्ण पाहता ३ हजार ८०० च्या वर रुग्ण या महिन्यात वाढले आहेत. दोनशेपेक्षा अधिक रुग्ण रोज जिल्ह्यात मिळून येत असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून तीनशेच्या वर जावून पोहचत आहे. बीड शहरासह जिल्ह्यातील विविध भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून मृतांची संख्याही वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. शासन-प्रशासन व्यवस्थेने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना योजिल्या आहेत. मात्र या उपाय योजनांकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.


२९४६ संशयितांमध्ये
आढळले २०७ बाधित

बीड (रिपोर्टर):- आरोग्य विभागाने काल १ हजार ९४६ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये २०७ जण बाधित आढळून आले आहे. बीड तालुक्यात आज ४२ रूग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ अंबाजोगाई ५६, आष्टी १७, धारूर ८, गेवराई ९, केज ११, माजलगाव २५, परळी १५, पाटोदा १२, शिरूर ८ तर वडवणी तालुक्यात ४ रूग्ण आढळुन आले आहेत.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...