Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाना. धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

ना. धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

बीड -ऑनलाईन रिपोर्टर

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे,साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी त्यांना मुंबईत कोरोनाची लागण झाली होती,त्यातून बरे होण्यासाठी त्यांनी मुंबईत उपचार घेतले होते,रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय कामात स्वतःला झोकून दिले होते .

दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी ट्विट करत आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करून घ्यावी असे आवाहन केले 

Most Popular

error: Content is protected !!