Sunday, April 18, 2021
No menu items!
Home क्राईम गंठण चोरणार्‍या महिलेला मुद्देमालासह घेतले ताब्यात

गंठण चोरणार्‍या महिलेला मुद्देमालासह घेतले ताब्यात


बीड (रिपोर्टर):- गर्दीचा फायदा घेऊन गंठण चोरणार्‍या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने गजाआड केले आहे. सदरील महिलेकडून चोरलेले गंठणही जप्त करण्यात आले आहे.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवगण राजुरी येथे दर्शनासाठी गेलेल्या गोदावरी परमेश्वर फिरंगे (रा. शाहूनगर) या वृद्ध महिलेचे गंठण २ मार्च रोजी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. काल गंठणचोर महिला बीड येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय भारत राऊत यांना मिळाल्यानंतर काल बीड बसस्थान परीसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी गंठण चोरणारी महिला जाधव निलाबाई सुखदेव (रा. मिरसांगवी ता. पाथर्डी) हिला ताब्यात घेतले. या वेळी तिच्याकडून चोरलेले गंठणही पोलिसांनी जप्त केले आहे.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....