बीड | प्रतिनिधी
जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे लॉकडाऊन केल्याने याचा निषेध करत आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पँथर सेना जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे व नितीन सोनवणे या दोघांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे कार्यरत असलेल्या पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.