बीड (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातल्या चकलांबा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित विषयाला शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होवू लागले. शिक्षक द्या अशी मागणी करत विद्यार्थी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले आहेत. शिक्षकासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते हि अत्यंत दुर्देवी बा आहे.
चकलांब्याची जिल्हा परिषद शाळा 130 वर्षाची आहे. या शाळेमध्ये मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शाळेच्या समस्येबाबत शिक्षण विभागा सातत्याने दुर्लक्ष करत आहे. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. शिक्षकासाठी वेळोवेळी तालुकास्तरावर मागणी करूनही मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. दहावीचे वर्ष महत्वाचे असताना शिक्षण विभाग शिक्षक देत नसल्याने संतप्त काही ग्रामस्थांनी मुलांना सोबत घेवून जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनामध्ये दहावी आणि नववीचे जवळपास 130 विद्यार्थी आहेत. मुलांना शिक्षकासाठी आंदोलन करावे लागते. ही अत्यंत दुर्देवी आहे.