Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडकुटे ग्रुपचा आधारवड कोसळला ज्ञानोबाराव कुटे यांचे निधन

कुटे ग्रुपचा आधारवड कोसळला ज्ञानोबाराव कुटे यांचे निधन

बीड (रिपोर्टर): कुटे ग्रुपचे आधारवड असलेले ज्ञानोबाराव कुटे यांचे आज दुखद निधन झाले. गेली 50 वर्षे उद्योग व्यवसायात अग्रेसर असणारे ज्ञानोबाराव कुटे हे ज्ञानराधा बँकेचे संस्थापक चेअरमन सुरेश कुटे यांचे वडील तर तिरूमला ऑईलच्या एमडी अर्चना कुटे यांचे सासरे होते. उद्या ज्ञानोबाराव कुटे यांच्या पार्थिवदेहावर अंन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्ञानोबाराव कुटे यांचे मृत्यूसमयी वय 82 एवढे होते. गेल्या 50 वर्षांपासून त्यांनी वेगवेगळ्या उद्योगव्यवसायामध्ये नाव कमावले. आज दुपारी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. उद्या शुक्रवार दि.2 एप्रिल रोजी काही ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये अंन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्ञानोबाराव हे ज्ञानराधा बँकेचे संस्थापक तथा चेअरमन सुरेश कुटे यांचे वडील तर तिरूमला आईलच्या एमडी अर्चना कुटे यांचे सासरे आहेत. कुटे ग्रुपवर कोसळलेल्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

Most Popular

error: Content is protected !!