भाजपाच्या वाचाळविरांना हाकलण्याची मागणी
बीड/गेवराई/आष्टी/पाटोदा/माजलगाव (रिपोर्टर) अखंड भारताचे दैवत युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहे आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत सातत्याने अवहेलनात्मक वक्तव्य करणार्या भाजपाच्या नेत्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद आज बीड जिल्ह्यात उमटले. शिवभक्तांनी पुकारलेल्या बीड जिल्हा बंदला जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळाला. कोश्यारी हटाओ, महाराष्ट्र बचाओच्या पाट्या गळ्यात अडकवून हजारो नागरिकांनी बीड शहरातून रॅली काढली. त्यामध्ये मोठ्या संख्येने अबालवृध्दांचा समावेश होता. तर जिल्ह्यातल्या गेवराई, वडवणी, आष्टी, केज, परळीसह अन्य ठिकाणीही हेच चित्र पहावयास मिळाले. राज्यपाल कोश्यारी यांच्या वाचाळवक्तव्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून कोश्यारी हटाओ, महाराष्ट्र बचाओच्या घोषणा जिथे तिथे दिल्या जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेल्या शिवभक्तांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.
गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांकडून महाराष्ट्राच्या युगपुरूषांबाबत अपशब्द वापरले जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, लोढा, लाड, दानवे, चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह शाहु,फुले,आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत अपशब्द काढले. त्यांच्या या वाचाळ वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद आज ीड जिल्ह्यात उमटले. बीडसह जिल्ह्यातील अन्य भागांमध्ये बंद पाळून या सर्व नेत्यांचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला. आज सकाळी डॉ.बाबासाहे आंबेडकर पुतळा येथून हजारो शिवभक्तांनी रस्त्यावर उतरत कोश्यारी हटाओ, महाराष्ट्र बचाओच्या घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. शिवभक्तांनी पुकारलेल्या बंदमध्ये शहरातील व्यापार्यांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्यात बीडसह गेवराई, आष्टी, परळी, केज याठिकाणी बंद पाळून भाजपातील वाचाळवीरांचा जाहिर निषेध करण्यात आला. बीड शहरातील शाळा, महाविद्यालयेही बंद होते.
कोश्यारीचे पाप, गरिबाचे पोट
छत्रपती शिवाजी महाराजांसह शाहु, फुले, आंबेडकर यांच्याबाबत भक्ती दाखवण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीत निपजलेल्यांना ंद करण्याची गरजच नाही. परंतू भाजप पुरस्कृत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सारखे आणि अन्य नेते जेव्हा महापुरूषांबाबत अपशब्द काढतात तेव्हा तो संताप व्यक्त करावा वाटतो. भगतसिंह कोश्यारीच्या पापामुळे आज गोरगरि व्यावसायीकांना एक दिवसाचा व्यवसाय बंद ठेवून पोटामारा करावा लागला. महापुरूषांबाबत अपशब्द काढल्यानंतरही भारतीय जनता पार्टी अशा वाचाळवीरांना पाठीशी घालते. तेव्हा भाजपाविरोधातही संताप व्यक्त केला जातो.