Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeक्राईमएपीआय संदीप काळेंची सतर्कता ; लावलेला गळफास ग्रामस्थांनी काढल्याने वाचले वृध्दाचे प्राण

एपीआय संदीप काळेंची सतर्कता ; लावलेला गळफास ग्रामस्थांनी काढल्याने वाचले वृध्दाचे प्राण

भागवत जाधव- गेवराई

रात्रीचे आठ वाजले होते… एक वीस वर्षीय युवक घाबरलेल्या अवस्थेत ठाण्यात आला. माझे वडील आत्महत्या करणार आहेत… साहेब त्यांना वाचवा वो, म्हणून विनंती करु लागला. यावेळी कर्तव्यावर असलेले सपोनि संदीप काळे यांनी सदरील युवकाला धीर देत सविस्तर माहिती घेतली. यानंतर लगेच त्या युवकाच्या वडिलाचा मोबाईल नंबर हा तातडीने ‘सायबर ब्रँच’कडे पाठवला. त्यानुसार अवघ्या काही मिनिटात ‘सायबर’कडून लोकेशन प्राप्त झाले. मात्र वेळ कमी, त्यातच काही अनुचित घडू नये म्हणून सपोनि काळे यांनी तत्परता दाखवून संबंधितांच्या गावातील ग्रामस्थ, नातेवाईकांना मिळालेल्या लोकेशनच्या दिशेने पाठवून माहिती देत राहिले. त्यानुसार ते नागझरी शिवारात एका शेतात पोहचले, तेव्हा त्यांना एका झाडाला गळफास घेऊन हात पाय खोडत लटकलेला अवस्थेत सबंधित व्यक्ती दिसला. त्याच क्षणी नातेवाईकांनी त्यांना खाली उतरून तातडीने गेवराई शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सपोनि यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले.

api sandip kale

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter
    सिनेमा अथवा मालिकेची स्टोरी वाटावी अशी घटना गेवराई तालुक्यातील नागझरी येथे घडली. येथील 50 वर्षीय तात्याराम (नाव बदलले आहे) हे शुक्रवारी सात वाजण्याच्या सुमारास घरातील वैयक्तिक वादातून रागावून घरातून बाहेर पडले. यानंतर त्यांनी काही वेळात त्यांच्या मुलाला फोन करून मी काही वेळात आत्महत्या करत असून तू मला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सोशल मीडियावर मेसेज व्हायरल कर म्हणून सांगितले. यानंतर त्यांनी फोन कट केला. त्यामुळे घाबरलेल्या त्यांच्या मुलाने थेट पोलिस ठाणे गाठून कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस निरीक्षक संदीप काळे यांना आपबिती सांगितली. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता काळे यांनी तात्याराम यांचा मोबाईल नंबर सायबर कडे पाठवून लोकेशन मागवून घेतले. यानंतर सायबरकडून देखील तात्काळ लोकेशन प्राप्त झाले. मात्र आपण तेथे जाण्यात वेळ वाया जाऊ शकतो, यामुळे काळे यांनी लागलीच तात्याराम यांचे गावातील नातेवाईक, ग्रामस्थांना लोकेशननुसार पाठवून त्यांना माहिती देत राहिले. यावेळी गावापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतात हे ग्रामस्थ, नातेवाईक पोहचले. त्यावेळी त्यांना समोरील चित्र पाहून धक्काच बसला. तात्याराम यांनी झाडाला गळफास लावून तो गळ्यात लटकावलेला होता, तर ते हात पाय खोडत असतानाच तेथे पोहचलेल्या नातेवाईक, ग्रामस्थांनी तात्याराम यांच्या गळ्यातील फास काढून त्यांना तातडीने शहरातील आधार हाँस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान काही क्षणाचा विलंब झाला असता तर तात्याराम हे जग सोडून गेले असते, मात्र सपोनि काळे यांनी दाखवलेल्या कर्तव्याच्या तत्परतेने तात्याराम यांचा जीव वाचला. एकीकडे हप्तेखोरी, लाचखोरी, कर्तव्यात कसूर आदींमुळे खाकी बदनाम होत असली तरी दुसरीकडे संदीप काळे सारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांमुळे पोलिस प्रशासनाविषयी जनतेत तेव्हढाच अभिमान देखील आहे. 


तात्याराम यांचे सपोनि काळेंनी केले समुपदेशन
   तात्याराम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री अकरा वाजता सपोनि काळे यांनी रुग्णालयात जाऊन तात्याराम यांचे समुपदेशन केले. कुठल्याही समस्येवर आत्महत्या हा पर्याय नाही, त्यामुळे यापुढे या मार्गाचा विचारही मनात आणायचा नाही, असे काळे यांनी सांगितले. तसेच तात्याराम यांच्या कुटूंबातील सदस्यांची देखील काळे यांनी समजून घातली.


सपोनि काळे यांचा पेढे भरवून केला सत्कार
    सपोनि यांनी कर्तव्यात दाखविलेल्या तत्परतेमुळेच आपल्या वडिलांचा जीव वाचला. यामुळे आनंदात असलेल्या तात्याराम यांच्या मुलासह नातेवाईक व ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी पोलिस ठाण्यात जाऊन सपोनि संदीप काळे यांचा सत्कार करुन त्यांना व ठाण्यातील उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना पेढे भरुन आनंद व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!