Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना आ.संदिप क्षीरसागरांची सूचना, बीड शहरात निर्जंतुकीकरण फवारणीच्या कामास सुरूवात

आ.संदिप क्षीरसागरांची सूचना, बीड शहरात निर्जंतुकीकरण फवारणीच्या कामास सुरूवात

उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी केली पाहणी; कोरोना रूग्णसंख्या वाढता पालिका प्रशासनाचे पाऊल

बीड (रिपोर्टर):- सध्या कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बीड शहरातही कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढू लागले असून या बाबत तातडीने उपाय योजना हाती घेण्यात याव्यात अशा सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केल्या होत्या. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केलेल्या सूचनानुसार उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी स्वत: उभे राहून बीड शहरात निर्जंतुकीकरण फवारणीचे काम हाती घेवून सदर कामाची पाहणी केली,शहरातील सहयोग नगर ,मोमीनपूरा भागात फवारणी सुरू असून उर्वरित भागात लवकरच करण्यात येणार आहे. बीड शहरात कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता सदर पाऊल उचलले आहे.

a4


बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात पालिका प्रशासनाकडून कोरोना संदर्भातील उपाय योजना करण्याबाबत काहीच हालचाली केल्या जात नसल्याने याबाबत नागरिकांनी आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.

a1

याबाबत आ.संदिप क्षीरसागर यांनी केलेल्या सूचनेनुसार उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी बीड शहरात कोरोना संदर्भातील उपाय योजना करण्यासाठी निर्जंतुकीकरण फवारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी माजी सभापती खुर्शीद आलम, नगरसेवक लक्षिमन इटकर सुनील महाकुंडे,एजाज सौदागर, रफिक कुरेशी,सहयोग नगर भागात झुंझार धांडे, पंकज बाहेगव्हनकर आदी उपस्थित होते.तसेच अग्निशमक दलाचे धायतीडक,कणतोडे व पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...