Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिथे निकड तिथे संदिप क्षीरसागर प्रकट

जिथे निकड तिथे संदिप क्षीरसागर प्रकट

रूग्णांसह नातेवाईकांना आधार देण्यासाठी चार दिवसापासून आमदाराचा
खडा पहारा; ऑक्सिजनच्या तुटवड्यानंतर पाठपुरावा करत दोनशे सिलेंडर

उपलब्ध करून दिले, ऑक्सिजन येईपर्यंत संदिप क्षीरसागर जिल्हा रूग्णालयात
बीड (रिपोर्टर): कोरोनाच्या समूह संसर्गाने बीड जिल्ह्यात हाहाकार उडवून ठेवला आहे. जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालय कोरोनाच्या रुग्णाने खचाखच भरले आहेत. कुठे ऑक्सिजनची कमतरता तर कुठे रेमडेसिवीर इंजेक्शन नाही. अशा गंभीर परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाबाहेर धावपळ करत आहेत. अशा रुग्णांना आणि नातेवाईकांना आधार देण्यासाठी तीन ते चार दिवसांपासून आ.संदीप क्षीरसागर जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात जावून रुग्णांची विचारपूत करत आहेत, त्यांना आधार देत आहेत. दिवसाची रात्र करत ज्या गोष्टीचा तुटवडा आहे ती गोष्ट आणण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. मध्यरात्री ऑक्सिजनचा तुटवडा जानवेल हे लक्षात आल्यानंतर संदीप क्षीरसागरांनी प्रयत्नांची परिकाष्टा करत 200 जम्बो सिलेंडर जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. ते उतरवून घेण्यापर्यंत संदीप क्षीरसागर जिल्हा रुग्णालयात रात्री तळ ठोकून होते. जिथे निकड तिथे संदीपभैय्या प्रकट असे समाधानकारक प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांतून व्यक्क्त होत आहे.
कोरोनाच्या समूह संसर्गाने अवघ्या देशाला वेठीस धरले आहे. बीड जिल्ह्यात कोरेाना समूह संसर्गाचा वाढत्या प्रभावामुळे रोज हजारांपेक्षा जास्त बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर न्युमोनियाने ग्रासलेल्यांची संख्याही रोज वाढत आहे. 1500 पेक्षा जास्त रुग्ण जिल्हाभरात ऑक्सिजनवर आहेत त्यामुळे जिल्ह्यात रेमडेसिवीर पाठोपाठ ऑक्सिजनचाही तुटवडा जानवू लागला आहे, अशा भयावह परिस्थितीत रुग्णांसह रुग्णांचे नातेवाईकही त्रस्त आणि भयग्रस्त झाल्याने त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बीड विधानसभा मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर हे जिल्हा रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयात प्रत्यक्ष जावून रुग्णांची भेट घेतात. त्यांना आधार देतात. नातेवाईकांसोबत बोलून ज्या काही अडीअडचणी असतील त्या ऑन दी स्पॉट सोडवण्याचा प्रयत्न करतात. बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दोन ते चार तास सातत्याने राहून तेथील प्रश्‍न जानून घेत शासन आणि प्रशासन दरबारी ते प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्टा करतात. ऑक्सिजनचा तुटवडा जानवत असल्याची माहिती काल मिळाल्यानंतर ऑक्सिजन मिळावा यासाठी संबंधीत एजन्सीसह शासन प्रशासन व्यवस्थेला बोलून 200 जम्बो सिलेंडर रात्रीतून उपलब्ध करून दिले. जोपर्यंत हे सिलेंडर रुग्णालयात येत नाहीत तोपर्यंत संदीप क्षीरसागर रुग्णालयातून हालले नाहीत. रात्री जेव्हा सिलेंडर आले, ते उतरून घेतले तेव्हाच संदीप क्षीरसागर घरी गेले. जिथे निकड तिथे संदीप क्षीरसागर प्रकट अशी समाधानकारक प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांतून व्यक्त होत आहे.जिथे निकड तिथे संदिप क्षीरसागर प्रकट

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!