परळी (रिपोर्टर) तालुक्यातील परळी- गंगाखेड रस्त्यावरील दादाहारी वडगावजवळ मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कार -जीपच्या भीषण अपघात झाला. यात एक ठार झाला तर 12 जण जखमी झाले.
परळी येथून दादाहारी वडगावकडे निघालेली कार (एमएच 26 एके 2626) व कार (एमएच 20 इजे 1084) या जीपचा भीषण अपघात झाला. यात वडगाव येथील कारचालक किशन इंगळे (32) जागीच ठार झाला तर जीपमधील 12 जण जखमी झाले. जखमींना अंबाजोगाई व लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.