Friday, October 22, 2021
No menu items!
HomeUncategorizedकोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच गर्भवतीने फोडला हंबर्डा, ताई घाबरू नको, म्हणत जातेगावच्या...

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच गर्भवतीने फोडला हंबर्डा, ताई घाबरू नको, म्हणत जातेगावच्या डॉक्टर राठोड यांनी दिला धिर


महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्याची अवस्था अत्यंत बेचैन होत असते. अशाच प्रकारे एका गर्भवती महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सदरील महिला प्रचंड प्रमाणात अस्वस्थ झाली व तिने हंबर्डा फोडला. सदरील महिलेची भीती दूर करण्यासाठी डॉ. राठोड यांनी ‘ताई घाबरू नको,’ तिला धिर देत तिची समजूत काढली. समजूत काढणार्‍या डॉ. राठोड यांची बीड जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा होत असून या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

dr.rathod


जिल्ह्यात दररोज एक हजारपेक्षा जात रुग्णांची संख्या निघत आहे. आतापर्यंत अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलाय. एखाद्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर तो व्यक्ती प्रचंड प्रमाणात घाबरून जातो. गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील एका सहा महिन्याची गर्भवती असलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महिला घाबरून गेली होती. तिने अक्षरश: हंबर्डा फोडला. या महिलेला सावरण्यासाठी आणि धीर देण्यासाठी डॉ. जीवनकुमार राठोड यांनी पुढे होत धिर दिला. ‘ताई घाबरू नको’, असे म्हणत महिलेला दिलासा दिला. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर त्याच्या जवळ जाण्यास लोक भीतात मात्र डॉ. जीवनकुमार राठोड यांनी महिलेच्या जवळ जात तिला धिर दिल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील उपचारासाठी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!