बीड (रिपोर्टर): शहरातील काळे गल्ली येथील 22 वर्षीय तरुण नामलगाव फाटट्याजवळील एका विहिरीमध्ये पोहचण्यासाठी गेला होता. सदरील तरुण बुडाला असून त्याच्या मृतदेहाचा शोध सुरूआहे. सकाळपासून दोन मोटारीद्वारे विहिरीतील पाणी उपसण्यास सुरुवात झाली. अग्निशामक दलासह बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल आहेत.
शैलेश मुकुंद विश्वास (वय 22 वर्षे, रा. काळे गल्ली) हा दुपारी नामलगाव फाटा येथील ढाकणे यांच्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. या तरुणाने विहिरीत उडी मारल्यानंतर तो परत आलाच नाही. सदरील तरुण बुडाला असून याची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना व अग्निशामक दलाला कळवल्यानंतर आज सकाळपासून विहिरीतील पाणी दोन विद्युत मोटारीद्वारे उपसण्याचे काम सुरूआहे. दुपारपर्यंत मृदेह सापडला नव्हता. घटनास्थळी पीएसआय काकर, पो.कॉ. तांदळे व अग्निशामक दलाचे कर्मचारी उपस्थित आहेत.