Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडनागरिकांनो, वेळेत उपचार घ्या; कोरोना शंभर टक्के बरा होतो दोन दिवसात २५७१...

नागरिकांनो, वेळेत उपचार घ्या; कोरोना शंभर टक्के बरा होतो दोन दिवसात २५७१ जणांनी केली कोरोनावर मात


बीड (रिपोर्टर):- कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी दुसरीकडे सकारात्मक बातमी आरोग्य विभागाकडून ऐकावयास मिळत आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल २५७१ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला न घाबरता लक्षणं जाणवल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी. वेळेत उपचार घेतले तर कोरोना शंभर टक्के बरा होत असल्याचे वरील आकडेवारीवरून दिसून येते.


शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने आपले पाय घट्ट केले आहेत. रोज दीड हजाराच्या जवळपास कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. हा आकडा चिंताजनक असला तरी दुसरीकडे रोज हजारोच्या पुढे रुग्ण ठणठणीत होऊन घरी जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला न घाबरता लक्षणे दिसून आल्यास (पान ७ वर)
तात्काळ आपली कोरोना तपासणी करून घेणे गरजेचे आहे. कोरोना झाला म्हणजे मृत्यू नाही. कोरोनावर तात्काळ उपचार केल्यास तो शंभर टक्के बरा होतो त्यामुळे नागरिकांनी अंगावर दुखणे न काढता तात्काळ आपली कोरोना टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यात २ हजार ७५५ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर २ हजार ५७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!