Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडजुनी फिस तात्काळ जमा करण्यासाठी इंग्रजी शाळांचा सपाटा

जुनी फिस तात्काळ जमा करण्यासाठी इंग्रजी शाळांचा सपाटा


दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सक्तीने पैसे वसूल करण्याचा प्रयत्न
बीड (रिपोर्टर):- जुनी राहिलेली फिस तात्काळ जमा करा, तुमच्या मुलाचे अंतर्गत मूल्यमापनाचे प्रत्येक विषयाचे मार्क बोर्डाला कळवायचे आहेत, टेस्ट पेपर जमा करा असे म्हणून कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक इंग्रजी शाळांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक मुलांच्या पालकांना शाळेत बोलावतात आणि शाळेत गेल्यावर तुमची राहिलेली फिस जमा केली तरच आम्ही तुमच्या मुलाचे अंतर्गत मुल्यमापनाचे मार्क्स बोर्डाला कळवू, असे सांगतात. तेही कोविड सारख्या महामारीत कडक लॉकडाऊन असतात. पालकांना बोलवायचे ही इंग्रजी शाळांची पद्धत अनेक पालकांना संतापजनक ठरत आहे. त्यामुळे याबाबीकडे तात्काळ शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेऊन अशा शाळांवर कारवाई करावी, प्रामुख्याने अशा घटना बीड शरातील संत ज्ञानेश्‍वर इंग्लिश स्कूलमध्ये घडून आलेल्या आहेत.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दहावी परिक्षेत सरसकट विद्यार्थ्यांना पास केलेले आहे. असे असतानाही बोर्डाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक शाळेने आपल्या विद्यार्थ्याची वर्षभरातील ऑनलाईन क्लास आणि टेस्टद्वारे जी शैक्षणिक प्रगती आहे त्याचा अहवाल बोर्डाला दिल्यानंतर एसएससी बोर्डाकडून अशा विद्यार्थ्यांना मानांकन पद्धतीद्वारे पास करण्यात येणार आहे. मात्र असते असतानाही पैसे लुटण्याचा व्यवसाय उभा केलेल्या बीड शहरातील अनेक शाळातील संस्था चालक, प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. काही किरकोळ अपवाद सोडता कुठेही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन किवा ऑपलाईन क्लास झालेल्या नाहीत. त्यामुळे कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांकडून फिस वसूल करण्याचा अधिकार उरत नाही. त्यात अनेक इंग्रजी शाळांच्या संस्था चालकांनी शक्कल लढवत प्राचार्य द्वारे इयत्ता दहावीमध्ये शिकणार्‍या प्रत्येक पालकाला शाळेत बोलावून विज्ञान विषयाचे अंतर्गत मूल्यमापनाचे टेस्ट पेपर सादर करा, टेस्ट पेपर सादर केल्यानंतर दोन टर्ममध्ये जी शैक्षणिक फिस आहे, ती राहिलेली बाकी तात्काळ जमा केली तरच तुमच्या विद्यार्थ्याचा टेस्टपेपर जमा करून बोर्डाला शैक्षणिक प्रगतीचा अहवाल जमा करू. तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अहवालही बोर्डाला देणार नाही, टेस्टपेपरही घेणार नाही, पुन्हा तुमचा विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेत कमी-जास्त मार्क घेतले तर आम्हाला बोलू नका, अशी दमदाटी विद्यार्थ्याच्या पालकाला करून त्याच्याकडून शाळेने कोणतीही सुविधा न देता सक्तीने फिस वसूल केली जाते, असे प्रकार बीड शहरातील संत ज्ञानेश्‍वर पब्लिक स्कूलमध्ये झालेले आहेत. या शाळेची गंभीर दखल जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!