Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमचालक-क्लिनरचे हातपाय बांधून ट्रक पळवला सिनेस्टाईलने पाठलाग करत पोलीसांनी दरोडेखोर पकडला

चालक-क्लिनरचे हातपाय बांधून ट्रक पळवला सिनेस्टाईलने पाठलाग करत पोलीसांनी दरोडेखोर पकडला


गेवराई (रिपोर्टर): परळीहून औरंगाबादला विटा घेवून जाणार्‍या ट्रकला दरोडेखोरांनी दगड मारला. ट्रकमध्ये बिघाड झाला की काय यासाठी चालकाने गाडी उभा करताच दरोडेखोरांनी चालक व क्लिनरचे हातपाय बांधून ट्रक पळवला. सदरील हा ट्रक दरोडेखोर वडीगोद्री येथे घेवून गेले, त्या ठिकाणी ट्रकचे टायर काढत असतांना तेथील पोलीसांनी पाहितले. पोलिसांना पाहताच दरोडेखोर दुसरा ट्रक घेवून बीडमार्गे फरार होण्याच्या बेतात होता. याची माहिती वडीगोद्री पोलिसांनी गेवराई पोलीसांना कळवली. त्यानुसार गेवराई पोलीसांनी बीड पोलीसांशी संपर्क साधत दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. दरोडेखोर मांजरसुंब्याजवळ पकडण्यात पोलीसांना यश आले.
काल परळीहून औरंगाबादकडे ट्रक विटा घेवून जात होता. गेवराई तालुक्यातील खांडवीजवळ दरोडेखोरांनी ट्रकला दगड मारला. दगडाचा आवाज आल्यानंतर चालकाने गाडी उभा केली. गाडीमध्ये बिघाड झाला की काय असे चालकास वाटल्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. गाडी थांबताच तीन चार दरोडेखोरांनी चालक आणि क्लिनरचे हातपाय बांधून ट्रक पळवला. दरोडेखोर वडीगोद्रीजवळ ट्रक घेवून गेले, त्या ठिकाणी ते गाडीचे टायर खोलत होते. हा प्रकार तेथील पोलीसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र दरोडेखोर अन्य दुसरा ट्रक घेवून बीडकडे फरार होण्याच्या बेतात होते. तेथील पोलीसांनी गेवराई ठाण्याचे रवींद्र पेलगुरवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नाकाबंदी केली मात्र दरोडेखोरांनी पाडळसिंगी येथील टोलनाक्यावर गाडी न थांबवता टोलनाका तोडून गाडी पळवली. गेवराई पोलीसांनी बीड पोलीसांशी संपर्क साधला व बीड पोलीसांनी सर्वत्र नाकाबंदी करून ट्रकचा पाठलाग सुरू केला. सिनेस्टाईलपद्धतीने हा पाठलाग सुरू होता. अखेर मांजरसुंब्याजवळ पोलीसांना दरोडेखोर पकडण्यात यश आले. अन्य काही दरोडेखोर फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान ही कारवाई पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी, डीवायएसपी स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पो.नि. रवींद्र पेगलुरवार, बीड पोलीस वाहतूक शाखा या कर्मचार्‍यांनी कारवाई केली.

Most Popular

error: Content is protected !!