Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनारमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करा

रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करा


ईदची नमाज घरीच अदा करून गोरगरिबांना मदत करा
मुफ्ती अब्दुल वाजीद अशरफी यांचे आवाहन

बीड (रिपोर्टर):- देशात कोरोनाचा संसर्ग सुरू असून हा संसर्ग अद्यापही आटोक्यात आलेला नाही. राज्य सरकारने १५ मेपर्यंत कडक निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईद साध्या पद्धतीने साजरी करत घरी नमाज अदा करावी, संकटाच्या कार्यकाळात गोरगरीबांना आवश्यक ती मदत करावी असे आवाहन मुफ्ती अब्दुल वाजीद अशरफी यांनी केले आहे.
गेल्या एक वर्षापासून आपल्या देशात कोरोनाचा संसर्ग आहे. हा संसर्ग अद्यापही आटोक्यात आलेला नाही. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कित्येक जण बाधीत झालेले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या राज्य सरकारने कडक निर्बंध लावलेले आहेत. अशा संकटाच्या काळात १३ किंवा १४ मे रोजी रमजान ईद साजरी होऊ शकते. यासाठी मुस्लिम बांधवांनी अगदी साध्या पद्धतीने ईद साजरी करत ईदची नमाज घरीच अदा करावी व शासनाने जी नियमावली ठरवून दिलेली आहे त्याचे काटेकोरपणे पालन करावे. गोरगरिब नागरिकांना आवश्यक त्या वस्तूंचे वाटप करावे, असे आवाहन हयात गु्रप बीडचे अध्यक्ष मुफ्ती अब्दुल वाजीद अशरफी यांनी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!