Tuesday, December 7, 2021
No menu items!
HomeUncategorizedसोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत नागरिकांची गर्दी

सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत नागरिकांची गर्दी

मोंढा, भाजी मंडईसह इतर ठिकाणच्या रस्त्यांवर लोकच लोक
बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊनच्या घोषणेला सशर्त सूट दिल्यानंतर आज सकाळी बीड शहरात भाजी मंडई, मोंढा भागासह इतर भागात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. रमजान ईद आणि अक्षय तृतीया हे दोन्ही सण तोंडावर असताना बाजारात इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. गर्दी टाळण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावलेले आहेत मात्र लोक पुन्हा गर्दी करून कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे.


महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य सरकारने १५ मेपर्यंत निर्बंध लावलेले आहेत. बीड जिल्ह्यातही कडक नियमावली लावली असून जिल्हा प्रशासनाने सकाळी सात ते दहा या वेळेत अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे बााजरात आज प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली. भाजी मंडई, मोंढा यासह अन्य ठिकाणी सकाळी लोकच लोक दिसून येत होते. रमजान ईद आणि अक्षय तृतीया हे दोन सण तोंडावर आले असल्याने खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले होते. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे आजच्या गर्दीवरून दिसून आले. गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर नियमावली लावली मात्र लोक जास्तच गर्दी करत कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे दिसून आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!