पर्समध्ये ठेवलेल्या 2 लाख रोख रक्कमेसह 4 लाख 80 हजार पळवले
ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
माजलगांव (रिपोर्टर):-तालुक्यातील लवुळ नं . 1 मधील रहिवासी तथा प्रकरणातील फिर्यादी संदिप लिंबाजी पवार या तरुणाच्या एकुत्या एक बहिणीचे लग्न पुणे येथील सुर्यप्रताप चंद्रकांत रननवरे याच्या सोबत शुक्रवार 10 फेब्रुवारी रोजी माजलगाव तेलगाव मार्गावरील शिवप्रताप मंगलकार्यालयात ारी 1 वा . च्या सुमारास सुरु असतानाच वधुच्या सासुबाई कडे त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेल्या 2 लाख रोख रक्कमे सह 4 लाख 80 हजारांची चोरी करून अज्ञात चोरट्यानी पोबारा केल्याची फिर्याद माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात संदिप पवार यांनी दिली आहे.
या प्रकरणी फिर्यादी संदिप पवार यांनी त्यांच्या फिर्यादीतम्हटले आहे की , त्यांच्या कुटुंबात त्यांच्या सह वडील लिंबाजी, आई सत्यभामा व बहिण दिपाली हे एकत्र राहतात आणि दिपालीचे लग्न पुणे येथील सुर्यप्रकाश चंद्रकांत रननवरे रा.सी – 10, चैतन्य कॉम्लेक्स शिवदर्शन रोड, पर्वती याच्यशी शिवप्रताप मंगल कार्यालय, पात्रुड येथे 10 फेब्रुवारी रोजीच्या दुपारी 12 : 45 वा.लग्न लागले. नंतर कन्यादान कार्यक्रम बाकी राहिला होता आणि दिपालीचे दागिने , नगदी 2 लाख रोख रक्कम दिपालीची सासु नामे मुक्ता चंद्रकांत रननवरे यांच्या पर्स मध्ये ठेवले होते . यानंतर फोटोसेशन चालु झाले होते त्यामुळे मुक्ता रननवरे यांनी त्यांच्या कडील पर्स त्यांची मुलगी आणि दिपालीची नणंद नामे स्नेहल स्वपनील मोहिते हिच्या कडे दिली होती . फोटो सेशन्स संपल्याने सर्वच स्टेज वरुन खाली आल्यावर ती पर्स गायब झाली शोधाशोध केली पण ती पर्स सापडली नाही . म्हणून संदिप पवार यांनी 10 फेब्रुवारी रोजीच्या रात्री 11 : 0 9वा.दिलेल्या फिर्यादी नुसार त्या पर्स मध्ये 2 लाख रोख रक्कम , एक सोन्याच गंठण ज्याच्या मध्ये सोन्याचे साखळ्या असलेले व दोन ठिकाणी गजर्या सारखे मणी असलेले दोन पळ्याचे 4 तोळे वजानाचे गंठण -2 लाख रुपये. 9 ग्राम वजनाचे कानातील झुंबर जोड 45 हजार रुपये , सोन्याच्या दोन वाट्या मणी असलेले मंगळसुत्र 5 हजार रुपये, 2 सोन्याच्या नथी – 8 हजार रुपये., कानतील पिंपळाच्या पानाचे डिझाईन असलेले – जोड – 5 हजार रुपये , बाळाच्या हातातील 14 मणी असलेल्या मणगट्या – 2 हजार , 500 रु., एक सैमसंग कंपनीचा मोबाईल- 10 लाख रुपये किंमतीचा. अश्या एकूण 4 लाख 80 हजारांची चोर अज्ञात चोरट्यानी केल्याची फिर्याद दाखल करण्यात आल्याने त्याच्या विरोधात भादंवि कलम 37 9नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत खरा चोर कोण याचा तपास सपोनि . विजयसिंह जोनवाल करत आहेत आणि त्या चोरट्याला ते लवकरच शोधुन काढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते.