बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये शेतकर्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. या नविन वर्षाच्या दिड महिन्याच्या कार्यकाळात 25 पेक्षा जास्त शेतकर्यांने आत्महत्या केल्या. वडगांव येथील एका 35 वर्षीय शेतकर्यांने गळफास घेवून आत्महत्या केली.
महादेव नानाभाऊ शिंदे या शेतकर्याने साडीच्या सहयाने गळफास घेवून आत्महत्या केली. सदरील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळविण्यात आली. या शेतकर्याने कुठल्या कारणावरुन आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येेचे सत्र सुरूच आहे. नविन वर्षाच्या दिड महिन्याच्या कार्यकाळात 25 पेक्षा जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.