Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज 85 वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई पोलीस प्रशासनाने ठेवला तगडा बंदोबस्त; वाहन...

आज 85 वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई पोलीस प्रशासनाने ठेवला तगडा बंदोबस्त; वाहन धारकांची कसून चौकशी


बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. जे लोक नियमाचे उल्लंघन करतात, त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करायला पोलीस प्रशासनाने सुरुवात केली आहे. वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे. दुपारपर्यंत 85 जणांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चर्‍हाटा फाटा, बार्शी रोड, जालना रोड यासह आदी ठिकाणी पोलीसांकडून वाहन धारकांची झाडाझडती घेतली जात आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर नियमावली लावलेली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधांत दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर सडकफिर्‍यांची अँटीजेन टेस्टही केली जाते. आज दुपारपर्यंत 85 वाहनधारकांवर कारवाई करत त्यांना दंड आकारण्यात आला आहे. प्रत्येक वाहधारकांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या वेळी पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, पाटील हे शिवाजी चौकात तळ ठोकून होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जालना रोड, बार्शी रोड, चर्‍हाटा फाटासह आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे.

Most Popular

error: Content is protected !!