Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडकोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकाना दोन वेळचे घरपोच जेवण चंपावती प्रतिष्ठाणची सामाजिक बांधिलकी

कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकाना दोन वेळचे घरपोच जेवण चंपावती प्रतिष्ठाणची सामाजिक बांधिलकी


बीड (रिपोर्टर):-गेल्या एक वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने अनेकांना अडचणीत गाठले आहे, कोरोना झाल्यावर अनेक कुटुंबांना घरगुती सामान आणि दोन वेळचे जेवण मिळणे अवघड होऊन बसते आशा संकटात बीडच्या चंपावती प्रतिष्ठानने मदतीचा हात पुढे आहे कोरोना ग्रस्तांच्या नातेवाईकांना पौष्टीक दोन वेळचे जेवण घरपोच देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे बीडचा युवा तरुण धनंजय वाघमारे त्यांचे दोन्ही भाऊ डॉ धनराज वाघमारे ,धनदीप वाघमारे व त्याची सर्व मित्र परिवार दररोज ही सेवा देत असल्याने अनेक रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळत आहे.
चंपावती प्रतिष्ठाणने मागील लॉकडाउन मध्ये हजारो लोकांना किराणा सामान किट वाटप करत गरजूंना आधार देण्याचे काम केले होते त्या नंतर यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट आली असून या संकटाचा काळात धनंजय वाघमारे हे मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून तेच काम ह्या लॉकडाउन मध्ये सुद्धा सुरुच ठेवले आहे. कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरी वेळेत दोन वेळेचे घरपोच मोफत पौष्टीक जेवण डबा पोहच करणे. हॉस्पिटल मधील ऍडमिट आहेत व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची सोय होत नाही त्यांनाही 2 वेळेचे जेवण देऊन दिलासा देत आहे

Most Popular

error: Content is protected !!