Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनागरजु मुलांच्या संगोपनासाठी कृती दलाची स्थापना महिला व बालविकास विभागाचा उपक्रम

गरजु मुलांच्या संगोपनासाठी कृती दलाची स्थापना महिला व बालविकास विभागाचा उपक्रम


बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या महामारीत ज्या बालकांचे पालक मृत्युमुखी पडले आहेत अशा बालकांसाठी तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालन रूग्णालयामध्ये दाखल आहेत अशा बालकांचे संपुर्ण संरक्षण, संगोपन, कायदेशीर हक्क व पुर्नवसन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फत जिल्हास्तरावर कृती दलाची स्थापना केली आहे. आपल्या आसपास असे बालक असेल तर त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कोरोना महामारीत अनेक जण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. अशा वेळी त्यांच्या पाल्यांची देखभाल करण्यासाठी नातेवाईक असमर्थता दर्शवतात. तर काही वेळा दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्याने. त्यांचे मुलं उघड्यावर पडतात यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला व बालकल्याण विभागामार्फत कृती दलाची स्थापना केली आहे. ज्या ठिकाणी असे बालक आढळून येतील तेंव्हा चाईल्ड लाईन टोल फ्री क्रमांक 1098, बालकल्याण समिती बीड 7588179848, 9423470437, बालगृह संपर्क क्रमांक 9923772694, 9763031020, शिशुगृह संपर्क क्रमांक 9422657164, जिल्हा बाल संरक्षण 9423470437, महिला व बाल विकास विभाग मदत कक्ष 830899222, महिला व बालविकास कार्यालय बीड 02442 230493 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!